कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुण डॉक्टरचा उपचारादरम्यान मृत्यू
By admin | Published: March 20, 2017 12:59 AM2017-03-20T00:59:50+5:302017-03-20T01:02:59+5:30
कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुण डॉक्टरचा उपचारादरम्यान मृत्यू
नाशिक : भरधाव कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुण डॉक्टरचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१९) सायंकाळी घडली़ मयत डॉक्टरचे नाव डॉ़ प्रणिल सुनील लोढा (२७, कमल बंगलो, सहदेवनगर, गंगापूररोड, नाशिक) असे आहे़ रंगपंचमीच्या दिवशी (दि़१७) दुपारी एक वाजेच्या सुमारास गंगापूर गावाजवळ हा अपघात झाला होता़
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास डॉ़ मयूर बोरा व डॉ़ प्रणिल लोढा हे यामाहा फ्रेझरने (एमएच १५, सीएन ५५३३) गंगापूरधरणाकडे जात होते़ गंगापूर गावाजवळ समोरून भरधाव आलेल्या फोर्ड फियास्टा कारने (एमएच १२, एफवाय १०८५) त्यांच्या दुचाकीस धडक दिली़ या कारमध्ये मद्यधुंद अवस्थेतील तीन तरुण व एक तरुणी होती़ या अपघातात डॉ़ लोढा यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने नागरिकांनी या दोघांना एका रिक्षातून रुग्णालयात दाखल केले़ या दोघांना गंगापूर रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेले असता उपचारास नकार देण्यात आला़