विजेचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:32 AM2018-07-10T01:32:44+5:302018-07-10T01:33:01+5:30
हरणबारी येथे मामाला शेतकामात मदत करताना लोखंडी नांगराच्या दांड्याचा ११ के. व्ही. विजेच्या तारांना स्पर्श होऊन दिनेश काळू चौरे (२२, रा. यशवंतनगर (धांद्री), ता. बागलाण) याचा जागीच मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरु णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
औंदाणे : हरणबारी येथे मामाला शेतकामात मदत करताना लोखंडी नांगराच्या दांड्याचा ११ के. व्ही. विजेच्या तारांना स्पर्श होऊन दिनेश काळू चौरे (२२, रा. यशवंतनगर (धांद्री), ता. बागलाण) याचा जागीच मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरु णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दिनेश चौरे हा तरुण चार-पाच दिवसांपासून हरणबारी येथील मामा काळू चौधरी यांना भेटण्यासाठी आला होता. शेतात मामा बैलांच्या साह्याने काम करत असताना त्यांना कामात मदत म्हणून दिनेश शेतातून खांद्यावर लोखंडी नांगर आणत होता. या शेताच्या वरून ११ के.व्ही. वीजवाहिन्या गेल्या आहेत. या वाहिन्या पूर्ण लोबंकळत्या स्थितीत असून, जमिनीपासून अवघ्या १० फूट उंचीवर आहेत. या तारांचा अंदाज आला नसल्याने नांगराच्या दांड्याचा वीजवाहिन्यांना स्पर्श होऊन दिनेशला शॉक लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. वेळोवेळी वीज कंपनीकडे तक्रार करूनही दुर्लक्षामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच वीज कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.