कर्जमाफीची माहिती; नाशिक अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:31 AM2017-10-11T01:31:14+5:302017-10-11T01:31:39+5:30

कर्जमाफीसाठी राज्य सरकारने तयार केलेल्या संकेतस्थळावर कर्जमाफीची माहिती अपलोड करण्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने अव्वल क्रमांक मिळविला आहे. सरकारच्या संकेतस्थळावर आतापर्यंत ३३२६ विविध कार्यकारी संस्था व बॅँक शाखांची माहिती अपलोड करण्यात आली असून, त्यापैकी नाशिक जिल्हा बॅँकेने ५२३ संस्थांची माहिती अपलोड केली आहे.

Debt waiver information; Nashik tops | कर्जमाफीची माहिती; नाशिक अव्वल

कर्जमाफीची माहिती; नाशिक अव्वल

Next

नाशिक : कर्जमाफीसाठी राज्य सरकारने तयार केलेल्या संकेतस्थळावर कर्जमाफीची माहिती अपलोड करण्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने अव्वल क्रमांक मिळविला आहे. सरकारच्या संकेतस्थळावर आतापर्यंत ३३२६ विविध कार्यकारी संस्था व बॅँक शाखांची माहिती अपलोड करण्यात आली असून, त्यापैकी नाशिक जिल्हा बॅँकेने ५२३ संस्थांची माहिती अपलोड केली आहे.
राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केल्यानंतर आपले सरकार पोर्टलवर पात्र शेतकºयांनी आॅनलाइन माहिती भरली आहे. त्यानंतर त्या माहितीची प्रत संबंधित विकास संस्थांमध्ये जमा केली आहे. त्यानंतर राज्य सरकारने दिलेल्या विहित ६६ तक्त्यांमध्ये संबंधित शेतकºयाची सर्व माहिती भरून त्याचे लेखा परीक्षक करून प्रत्येक अर्ज सहकार विभागाने नेमलेल्या लेखा परीक्षकांकडून तपासून घेण्यात आला आहे. ही तपासणी झाल्यानंतर जिल्हा बॅँकेचे कर्ज वाटणारी प्रत्येक विकास संस्था व इतर बॅँकांच्या शाखांमधून दिलेल्या कर्जाची एकत्रित माहिती आता राज्य सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस संस्थानिहाय माहिती अपलोड करण्यास सुरुवात झाल्यानंतर आठ-दहा दिवसांमध्ये नाशिक जिल्हा बॅँकेने १०२३ विविध कार्यकारी सहकारी संस्थांपैकी ५१२ संस्थांची माहिती अपलोड केली आहे. राज्यातील इतर बॅँकांच्या तुलनेत नाशिक जिल्हा बॅँकेने माहिती अपलोड करण्यात प्रथम क्र मांक मिळवला आहे. जिल्हा बॅँक किंवा इतर बॅँकांनी कर्जमाफीसाठी पात्र ठरणाºया शेतकºयांची माहिती अपलोड केल्यानंतर त्या माहितीची पुन्हा तपासणी होत आहे. त्यात त्रुटी असल्यास ती बाब जिल्हा बॅँकांना कळवून त्यांच्याकडून दुरुस्ती करून घेतली जात आहे. यामुळे दिवाळीपूर्वी तरी ही माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांकडून समजते.

Web Title: Debt waiver information; Nashik tops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.