कर्जमाफी नव्हे, तर ऐतिहासिक फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:31 AM2017-10-29T00:31:13+5:302017-10-29T00:31:19+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून शेतकºयांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी असल्याची ओरड केली जात आहे, मात्र फसलेली ही कर्जमाफी ही शेतकºयांची ऐतिहासिक फसवणूक असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला.

Debt waivers, but not historic fraud | कर्जमाफी नव्हे, तर ऐतिहासिक फसवणूक

कर्जमाफी नव्हे, तर ऐतिहासिक फसवणूक

Next

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून शेतकºयांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी असल्याची ओरड केली जात आहे, मात्र फसलेली ही कर्जमाफी ही शेतकºयांची ऐतिहासिक फसवणूक असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतकºयांच्या खात्यात दमडीही जमा झालेली नाही. या फसलेल्या कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांनी आता राज्यातील शेतकºयांची माफी मागावी, अशी मागणी विखे यांनी यावेळी केली.  नाशिकला शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ना. विखे बोलत होते. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफी योजना आणली खरी; मात्र योजनेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे या सरकारच्या अजेंड्यावर शेतकरी नसल्याचे स्पष्ट होत आहे. कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांची आकेडवारी सांगता सांगता सरकारची बौद्धिक  दिवाळखोरी जनतेसमोर येत आहे. दिवाळी गोड करण्याच्या नादात प्रमाणपत्र देण्याचा फार्स करण्यात  आला.  मात्र, प्रमाणपत्र पुन्हा घेण्याची नामुष्की या सरकारवर ओढविली आहे. त्यामुळे या सरकारने कर्जमाफीचा फुटबॉल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे सांगतात. प्रत्यक्षात मात्र एक दमडीही खात्यात जमा झालेली नाही. यावर सहकार विभाग, तंत्रज्ञान विभागाच्या चुका असल्याचा कांगावा सरकार करत आहे. यातून सरकार स्वत:चे पाप झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे राधाकृष्ण विखे- पाटील यांनी यावेळी सांगितले. राज्य सरकार कुपोषण, अंगणवाडी कर्मचारी प्रश्न तसेच आदिवासी विभागातील योजनांवर सपशेल अपयशी ठरले असून, मंत्र्यांवर भ्रष्टाचाराची मालिकाही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेस विनायक देशमुख, आमदार डी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, शिरीषकुमार कोतवाल, अनिल आहेर, डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे उपस्थित होते.

Web Title: Debt waivers, but not historic fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.