जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 01:01 AM2019-04-15T01:01:31+5:302019-04-15T01:05:53+5:30

नाशिक : जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, सिन्नर व मालेगाव तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. जिल्ह्णात आजपर्यंत २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे.

Debt-wise farmers suicides in the district | जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

Next

नाशिक : जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, सिन्नर व मालेगाव तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. जिल्ह्णात आजपर्यंत २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे.
शुक्रवारी सिन्नर तालुक्यातील मºहळ बु. येथील संतोष कारभारी शेळके (४२) या शेतकºयाने त्याच्या भावाच्या गट नंबर ३५ मधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. कर्जाला कंटाळून या शेतकºयाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. मºहळ बुद्रुक - सुरेगाव रस्त्यावरील शेळके वस्तीवर सदरचा प्रकार घडला. शेळके यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने त्यांनी आत्महत्या केली. शेळके यांनी शेतीसाठी विकास सोसायटीचे ७५००० रु पयाचे कर्ज घेतलेले होते. त्याच्या पश्चात पत्नी,
दोन लहान मुले व आई असा परिवार आहे. वावी पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात
आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एस. सदगीर करत आहे. अशीच घटना मालेगाव तालुक्यातील नरडाणे येथे घडली. बाजीराव त्र्यंबक भामरे (६०) या वयोवृद्ध शेतकºयाने विष प्राशन करून आत्महत्या केली. गेल्या दोन वर्षांपासून शेतकºयांच्या आत्महत्येच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने आत्महत्या रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या. राज्य सरकारने शेतकºयांचे सरसकट दीड लाख रुपयांचे कर्ज माफ केले, तर केंद्र सरकारनेही चालू वर्षापासून शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. सरकारच्या या मदतीमुळे शेतकºयांच्या आत्महत्या रोखल्या जातील असे वाटत असताना चालू वर्षीदेखील जानेवारी महिन्यापासून शेतकºयांच्या आत्महत्या कायम आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांत २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. या दोन्ही घटनांची दखल घेण्यात आली असून, महसूल व पोलीस खाते घटनेचे कारण शोधत आहे.

 

Web Title: Debt-wise farmers suicides in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.