घोटीत टमाटे ५० पैसे किलो, शेतकऱ्यांनी फेकले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:53 PM2018-04-13T12:53:46+5:302018-04-13T12:53:46+5:30
घोटी : घोटी बाजार समितीत विक्र ीसाठी येणाºया टमाट्याला ५० किलो पैसे इतका कवडीमोल भाव मिळत असल्याने टमाटा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या बाजारात टमाट्याची पंचवीस किलोचे कॅरेट अवघ्या दहा ते पंधरा रुपयाला मागत असल्याने शेतकरी हा माल घरी न नेता रस्त्यावर फेकून देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. घोटी बाजार समितीत टमाट्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे.यामुळे व्यापारी मनमानीपणा करीत शेतीमाल मातीमोल भावाने खरेदी करीत आहेत.यात टमाटे ला अवघा पन्नास पैसे किलो दराने मागणी होत असल्याने टमाटा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.दरम्यान विक्र ी न झालेल्या टमाट्याला शेतकरी नाईलाजास्तव रस्त्यालगत फेकून देऊन आपला रोष व्यक्त करीत आहे.
------------------
लागवडीचा खर्च ही भागेना
टमाटे लागवडीसाठी महागडी बियाणे,औंषधे, मजुरी देऊनही योग्य भाव मिळत नसल्याने लागवड खर्च ही सुटत नसल्याने शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.