शेतकºयांना वीज बिलासाठी डिसेंबरअखेरची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:09 AM2017-11-28T01:09:12+5:302017-11-28T01:12:49+5:30

शेतकºयांच्या थकीत वीज बिलासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना जाहीर करूनही अपेक्षित कृषी वीज बिल भरणा होऊ शकला नसल्याने शेतकºयांनी योजनेला फारसा  प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येते. योजना लागू करूनही शेतकºयांचे बिलासंदर्भातील प्रश्न कायम असल्याने राज्यातील ग्राहक संघटनांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकºयांना वीज बिलातच दुरुस्ती आणि सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शेतकºयांची वीज बिले दुरुस्त करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे.

December deadline for power bills to farmers | शेतकºयांना वीज बिलासाठी डिसेंबरअखेरची मुदत

शेतकºयांना वीज बिलासाठी डिसेंबरअखेरची मुदत

Next

नाशिक : शेतकºयांच्या थकीत वीज बिलासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना जाहीर करूनही अपेक्षित कृषी वीज बिल भरणा होऊ शकला नसल्याने शेतकºयांनी योजनेला फारसा  प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येते. योजना लागू करूनही शेतकºयांचे बिलासंदर्भातील प्रश्न कायम असल्याने राज्यातील ग्राहक संघटनांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकºयांना वीज बिलातच दुरुस्ती आणि सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शेतकºयांची वीज बिले दुरुस्त करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे.  राज्य शासनाने महावितरणमार्फत शेतकरी वीज ग्राहकांसाठी कृषी संजीवनी योजना जाहीर केली होती. मात्र मुदतवाढ देऊनही योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. शेतकºयांना आलेली अवास्तव वीज बिले तसेच अंदाजित बिलांमुळे शेतकºयांवर मोठा आर्थिक बोजा आला होता. अनेक शेतकºयांना तर पुरवठा नसतानाही त्यांना देयके देण्यात आली होती. हा मूळ प्रश्न कायम असताना केवळ बिल भरण्यावर सवलत देण्यासाठी कृषी संजीवनी योजना जाहीर करण्यात आली होती. याबाबतच्या तक्रारी ग्राहक संघटनांकडे आल्यानंतर राज्यातील प्रमुख ग्राहक प्रतिनिधींनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर वावनकुळे यांची भेट घेत चर्चा केली होती. यावेळी ऊर्जा सचिव, महातिरणचे व्यवस्थापकीय संचालक हेही उपस्थित होते. यावेळी बावनकुळे यांनी मूळ बिलातील दोष दूर करण्यात येईल, असे जाहीर करून सवलतही जाहीर केली.  यासंदर्भात नाशिक वीज ग्राहक समितीचे सचिव सिद्धार्थ सोनी यांनी सांगितले की, ज्या शेतकरी ग्राहकांचे कृषी बिल ३० हजारापेक्षा कमी असेल त्यांना ३ हजार रुपये तर ज्यांची थकबाकी ३० हजारापेक्षा जास्त असेल त्यांना ५ हजार रुपये भरून कृषी संजीवनी योजनेत सहभागी करून घेण्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. तसेच ज्या शेतकºयांची बिले जास्त आहेत त्यांनी तक्रार नोंदविल्यास त्यांची बिले तपासून ३१ डिसेंबरपर्यंत दुरुस्त करून दिली जातील, असेही आश्वासन दिले आहे. 
ज्या शेतकरी ग्राहकांना विजेच्या बिलाबाबत अडचणी असतील त्यांनी वीज ग्राहक समितीकडे लेखी तक्रार नोंदवावी, असे आवाहन समितीने केले आहे. सर्व शेतकरी ग्राहकांची बिले तपासणी केली जाणार आहेत. तसेच ज्यांना विनामीटर पुरवठा दिलेला आहे त्या शेतकरी ग्राहकांचा जोडभार तपासला जाणार आहे. बंद मीटरच्या प्रकरणात फिडरनिहाय इनपूट बघून बिल दुरुस्त केले जाणार असल्याचे वीज ग्राहक समितीचे सचिव सिद्धार्थ सोनी यांनी कळविले आहे.

Web Title: December deadline for power bills to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.