सोने उजळून देण्याच्या बहाण्याने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 03:30 PM2020-02-05T15:30:50+5:302020-02-05T15:30:58+5:30
नायगाव : सोने उजळून देण्याच्या बहाण्याने हातात घेतलेले सुमारे सहा तोळे सोने अज्ञात भामट्याने हातोहात लंपास केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे घडली.चोरीच्या नव्या फंडयाने परिसरात खळबळ उडाली आहे.
नायगाव : सोने उजळून देण्याच्या बहाण्याने हातात घेतलेले सुमारे सहा तोळे सोने अज्ञात भामट्याने हातोहात लंपास केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे घडली.चोरीच्या नव्या फंडयाने परिसरात खळबळ उडाली आहे.
पास्ते येथील काजीखोरा भागात मंगळवारी (दि. ४) दुपारी दोनच्या सुमारास सरदवाडी रस्त्याने मोटारसाईकलवर आलेल्या अज्ञात चोरट्याने आव्हाड वस्तीवरील जनाबाई विठ्ठल आव्हाड व सिंधुबाई अशोक आव्हाड या महिलांकडे जाऊन सोने-चांदी उजळुन देतो असे म्हणून या महिलांना गळ घातली. या दोन्ही महिलांनी गळ्यातील मंगळसुत्र, फुल, कानातील वेल, डोरले व पोत असे सर्व दागिने या भामट्याच्या हातात दिले.यावेळी एका महिलेला घरातील एका पातिल्यात पाणी टाकून देण्याची विनंती केली. हे दागिने त्या पातेल्यात टाकण्याच्या वेळेस हातचलाखी करत स्वताच्या खिशात टाकले .पाणी असलेले पातेले गँसवर ठेवत महिलांशी गप्पामारत दागिने उजळण्यासाठी किमान अर्धातास गँस सुरू ठेवण्यास सांगितले .तोपर्यंत मी बाहेरून येतो असे सांगुन हा भामटा बाहेर पडला. दरम्यान अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ होऊनही कारागीर का आला नाही या विचाराने या दोन्ही महिलांची चलबिचल झाली. आणखी थोड्या वेळाने गँसवरील पातेले खाली घेऊन बघितले असता त्यात एकही सोन्याचा दागिना दिसत नसल्याचे बघुन या महिलांनी आरडाओरडा केला. मात्र कारागीर येत नसल्याचे लक्षात येताच आपल्याला फसविल्याचे लक्षात येताच महिलांना रडु कोसळले. घरातील , सर्व माणसांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी पुतण्या राजु आव्हाड यांनी सिन्नर पोलिसात अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्र ार दाखल केली.
---------------------
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे.चोरी करण्याच्या पध्दतीतही बदलत झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दागिने उजळून देण्याच्या पध्दतीने काही दिवसांपूर्वी चिंचोली येथे ही दागिने लांबविले होते.वारंवार होणार्या घटनां घडुनही नागरिक सतर्क होत नसल्यामुळेच चोरटे निर्धावले आहे.