डेसिबल मर्यादेने साउंड सिस्टीम व्यवसायात शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:46 AM2017-08-30T00:46:56+5:302017-08-30T00:47:01+5:30
यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी असलेला गोंगाट पोलीस मोजत असून, उत्सवात आवाज मर्यादेत ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिले असल्याने साउंड सिस्टीम व्यवसायातही यावर्षी शांतता असल्याची माहिती नाशिक साउंड सिस्टीम वेल्फे अर असोसिएशनने दिली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी असलेला गोंगाट पोलीस मोजत असून, उत्सवात आवाज मर्यादेत ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिले असल्याने साउंड सिस्टीम व्यवसायातही यावर्षी शांतता असल्याची माहिती नाशिक साउंड सिस्टीम वेल्फे अर असोसिएशनने दिली आहे. नव्या साउंड मीटरमुळे पोलिसांना कारवाई करणे सोपे झाले असून, गेल्या वर्षी पोलिसांनी आवाजाची मर्यादा ओलांडणाºयांवर सुमारे ३७ गुन्हे दाखल केल्यामुळे व्यावसायिकांना यंदाही आवाजाबाबत पोलिसांनी काटेकोर धोरण पाळत ठेवत कडक कारवाईचा इशारा दिल्याने साउंड व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. नाशिक शहरात जवळपास अडीचशे साउंड सिस्टीम व्यावसायिक आहेत. यातील २५ ते ३० साउंड सिस्टीम अत्याधुनिक आहे. या व्यावसायिकांची दहा दिवसांचा गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीची सुपारी एक ते सव्वा लाख रुपयांपर्यंत असते, तर लहान मंडळांना सेवा पुरविणाºया व्यावसायिकांची गणेशोत्सव काळात ३५ ते ३० हजार रुपये व विसर्जन मिरवणुकीचे २० ते २५ हजार रुपये अशी सुमारे ५० ते ६० हजार रुपयांची सुपारी असते. अशाप्रकारे संपूर्ण गणेशोत्सवात दरवर्षी लहान व मोठ्या साउंड सिस्टीम व्यावसायिकांचा कोट्यवधींचा व्यवसाय होतोय परंतु, मर्यादेमुळे मंडळांनी घरगुती साउंड सिस्टीमचा वापर केला आहे, तर माध्यम स्वरूपाच्या मंडळांनी मंडप डेकोरेटर्सकडून साउंड सिस्टीमची व्यवस्था केली आहे. मोठ्या मंडळांनीही साउंड व स्पीकरचे प्रमाण कमी केले आहे. त्यामुळे साउंड व्यावसायिकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.