अध्यक्षपदासह ११ उमेदवारांच्या अर्जावर आज निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:43 AM2018-07-15T00:43:44+5:302018-07-15T00:44:46+5:30
सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत दाखल झालेल्या अर्जांची छाननी सुरू झाली असून, या छाननीत अध्यक्षपदाच्या उमेदवारासह उद्योग विकास पॅनलच्या १० ते ११ उमेदवारांच्या अर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रविवारी याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

जिल्ह्यातील अग्रणी समजल्या जाणाऱ्या निमा या औद्योगिक संघटनेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी एकता आणि उद्योग विकास पॅनलच्या उमेदवारांनी ४१ जागांसाठी १३१ अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी निवडणूक यंत्रणेकडून उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ती तीन दिवस चालणार
आहे. शनिवारी उद्योग विकास पॅनलचे उमेदवार आणि अन्य १० ते १२ उमेदवारांच्या अर्जातील त्रुटींमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे अर्ज अवैध ठरविण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्तता करून घेण्यात येणार आहे.
स्पष्टीकरण मागविण्यात येणार
उमेदवारी अर्ज छाननीप्रक्रियेत अध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्रकुमार वाणी यांनी निमाच्या घटनेनुसार यापूर्वी कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केलेले नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरू शकतो. तसेच अन्य काही उमेदवारांच्या अर्जाबाबतीत काही प्रश्नचिन्ह आणि शंका निर्माण झाल्या असून, रविवारी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे. त्यानंतर अर्ज वैध की अवैध ठरविण्यात येणार आहे. रविवारी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.