सातपूरला ‘भीम महोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:13 AM2021-03-06T04:13:48+5:302021-03-06T04:13:48+5:30
सातपूर : आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या सातपूर विभागात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘भीम महोत्सव’ म्हणून एकत्रित साजरा ...
सातपूर : आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या सातपूर विभागात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘भीम महोत्सव’ म्हणून एकत्रित साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जयंती समिती अध्यक्षपदी मोहन अडांगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सर्व समाजघटकांना सोबत घेऊन हा भीम महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्ताने प्रबोधनात्मक भीम व्याख्यात्यांचे व्याख्यान तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपटावर महानाट्याचे आयोजन करुन सातपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करण्याचा निर्णयदेखील या बैठकीत घेण्यात आला आहे. यावेळी जयंती समितीची निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी मोहन आढागळे, कार्याध्यक्षपदी योगेश गांगुर्डे, उपाध्यक्षपदी नीलेश भंदुरे, खजिनदारपदी अरुण काळे आदींचा समावेश आहे. यावेळी प्रभाग सभापती रवींद्र धिवरे, समितीचे वसंत पंडित, रवी काळे, बजरंग शिंदे, काळू काळे, नंदकुमार जाधव, गणेश गांगुर्डे, बिपीन कटारे, रवींद्र काळे, भावेश पवार, राहुल पटेकर, सत्यवान चक्रे, नाना तपासे, सुनील काळे, संजय तायडे, मनोज पगारे, शिवाजी गायकवाड, अमोल जेठीथोर, अशोक शिरसाठ, भागवत गायकवाड, देवा सोनवणे आदींसह समिती सदस्य उपस्थित होते.
(फोटो ०५ सातपूर)