५० हजार संस्था बंद करण्याचा निर्णय

By admin | Published: September 20, 2015 10:39 PM2015-09-20T22:39:26+5:302015-09-20T22:40:21+5:30

कळवण : सदगुरू गजानन पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी दादा भुसे यांची माहिती

Decision to close 50 thousand institutions | ५० हजार संस्था बंद करण्याचा निर्णय

५० हजार संस्था बंद करण्याचा निर्णय

Next

कळवण : $ग्रामीण व शहरी भागात पतसंस्था उघडल्यानंतर त्या शासनाचा अंगीकृत एक भाग आहे असे समजून नागरिक आपल्या ठेवी ठेवतात, अडचणीत आलेल्या संस्थांमुळे ठेवीदार अडचणीत येतात त्यामुळे आता नागरिकांच्या ठेवींना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी सरकार येत्या दोन महिन्यात पतसंस्थांसाठी नवीन धोरण आखत असून, कॅरीबॅगमधील ५० हजारांहून अधिक संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.
कळवण येथील श्री सदगुरु गजानन महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या उद््घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात भुसे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. श्री सदगुरू गजानन महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उद््घाटन महंत रामलखनदास महाराज यांच्या हस्ते व खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जे. पी. गावित, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, मविप्र संचालक रवींद्र देवरे, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, पंचायत समितीचे माजी सभापती कौतिक पगार, कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कारभारी अहेर, कळवणचे माजी सरपंच अ‍ॅड. परशुराम पगार, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, उद्योगपती बेबीलाल संचेती, यादवराव पवार व अशोक पवार आदि प्रमुख उपस्थित झाले. यावेळी मान्यवरांचा सत्कार पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत देवघरे, उपाध्यक्ष रोहिणी देवरे, संचालक प्रकाश अहिरराव, प्रवीण कोठावदे, कैलास खैरनार, अरविंद कोठावदे, प्रशांत पगार आदिंसह संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़
दादा भुसे पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात पतसंस्थांकडे बघायचा हेतू बदलत चाललेला असताना कळवणसारख्या तालुक्यात पतसंस्था वाढीस लागत असून, कळवणमध्ये पतसंस्था व बँका यांचे कामकाज खरोखरच कौतुकास्पद आहे़ मूठभर लोकांनी सहकार बदनाम करून भ्रष्टाचार केला अशा लोकांना खड्यासारखे दूर करून सहकारात चांगल्या लोकांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले़ राज्यात तीन लाख २० हजार सहकारी संस्था असून, ज्या स्थापन झाल्या आहेत, त्या उदिष्टेप्रमाणे काम करत नसणाऱ्या ५० हजारांहून अधिक कागदोपत्री असलेल्या कॅरीबॅगमधील संस्था बंद करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले असल्याचे यावेळी सांगितले़ खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले की, कागदावरील संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला, हा निर्णय स्वागतार्ह आहे. आमदार जे.पी. गावित यांनी वसाका पुनर्जीवित करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत देवघरे यांनी केले. यावेळी
परशुराम पगार, के. के. शिंदे, किशोर पगार हिरामण पगार, नंदकुमार खैरनार, मोहनलाल संचेती, नितीन वालखडे, प्रवीण संचेती व पतसंस्थेचे असंख्य हितचिंतक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Decision to close 50 thousand institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.