लासलगावी सलून व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 03:53 PM2020-07-06T15:53:47+5:302020-07-06T15:55:11+5:30
लासलगाव : विंचूरसह परिसरात कोरोना बाधित रु ग्णांची संख्या वाढलेली असल्याने लासलगाव शहरातील सलून व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने संपूर्ण आठवडाभर सलून व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोमवारी श्री विठ्ठल-रु क्मिणी मंदिर सभागृहात समाजबांधवांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोरोना बाधितांची संख्या जिल्ह्यात सर्वत्र वाढत आहे . तीन महिने सलून व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता. राज्य सरकारने दि. २८ जूनपासून सलून व्यवसायाला परवानगी दिलेली आहे. मात्र सलून व्यवसाय करताना थेट संपर्क येत असल्याने मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लासलगाव नाभिक समाज बांधवांनी एकत्रित येत आपापले व्यवसाय संपूर्ण आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सलून व्यावसायिक कुणाच्याही घरी जाऊन आपली सेवा देणार नसल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले आहे. पुढील आठवड्यापासून फक्त मंगळवार ते शुक्र वार सलून व्यवसाय सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरू राहणार आहेत. सलून व्यवसाय करताना व्यावसायिकांनी काळजी घेऊन एकदा वापर केलेल्या वस्तूचा दुसऱ्यांदा वापर न करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आलेला आहे. याप्रसंगी नाभिक समाजाचे पदाधिकारी व श्री संत सेना चॅरीटेबल ट्रस्टचे पदाधिकारी तसेच सलून व्यावसायिक उपस्थित होते.