बोकटेत पुन्हा एकदा गावबंदचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:16 AM2021-04-28T04:16:10+5:302021-04-28T04:16:10+5:30
बोकटे, देवळाणे, दुगलगाव परिसरात कोरोनाने कहर केला आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासकीय यंत्रणेसह ग्रामपंचायत प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी फिल्डवर उतरले ...
बोकटे, देवळाणे, दुगलगाव परिसरात कोरोनाने कहर केला आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासकीय यंत्रणेसह ग्रामपंचायत प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी फिल्डवर उतरले आहेत.
कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या बोकटे, देवळाणे, दुगलगाव परिसरात पन्नासवर बाधित रुग्ण आढळून आले आहेत. येथील कोरोना नियंत्रण समितीने वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, पुन्हा १ मे पर्यंत गावबंदचा निर्णय घेतला आहे, तसेच बोकटे, देवळणे, दुगलगाव येथील सरपंच व अंदरसुल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने संयुक्तपणे बोकटे येथे कोविड लसीकरण व चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले. उर्वरित ग्रामस्थांसाठी पुन्हा लसीकरण शिबिर घेण्याची मागणी केली जात आहे. जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले यांनीही संबंधितांकडे शिबिरासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी, कोरोना नियम पाळून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच प्रताप दाभाडे, ग्रामसेवक भाऊराव मोरे यांनी केले आहे.