कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वणीत चार दिवस बंदचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 08:38 PM2020-07-28T20:38:19+5:302020-07-29T00:41:39+5:30
वणी : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये व विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी वणी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बुधवार दि.२९ जुलै ते शनिवार दि. १ आॅगस्टपर्यंत सर्व व्यवसाय बंद ठेवाण्याचे आदेश ग्रामपालीकेने काढले आहे.
Next
ठळक मुद्दे सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात येणार
वणी : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये व विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी वणी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बुधवार दि.२९ जुलै ते शनिवार दि. १ आॅगस्टपर्यंत सर्व व्यवसाय बंद ठेवाण्याचे आदेश ग्रामपालीकेने काढले आहे.
दुध संकलन केन्द्र, मेडीकल स्टोअर, हॉस्पीटल व पिठाच्या गिरण्या, रासायनिक खते व बि-बियाणे आदी अत्यावयक व्यवसाय या कालावधीत सुरु राहणार असुन उर्वरीत सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहे.