द्राक्ष उत्पादकांचा रोखीने व्यवहार करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:11 AM2018-03-03T00:11:11+5:302018-03-03T00:11:11+5:30
बेहेड गावातील शेतकºयांची दरवर्षी द्राक्ष व्यापाºयांकडून फसवणूक होत असते. ती टाळण्यासाठी येथील ग्रामस्थांनी द्राक्ष मालाचा रोखीत व्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. द्राक्ष उत्पादकांसाठी बोलावलेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पिंपळगाव बसवंत : बेहेड गावातील शेतकºयांची दरवर्षी द्राक्ष व्यापाºयांकडून फसवणूक होत असते. ती टाळण्यासाठी येथील ग्रामस्थांनी द्राक्ष मालाचा रोखीत व्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. द्राक्ष उत्पादकांसाठी बोलावलेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. द्राक्ष माल विक्र करताना सर्व द्राक्ष उत्पादकांनी व्यापाºयांसोबत रोख स्वरूपात पैसे अदा करणार असेल तरच व्यवहार करावा. द्राक्ष मालाचे व्यापाºयांकडून पैसे स्वीकारताना कोणत्याही स्वरूपात एक दोन टक्के वापसी अथवा कटोती न करता रोख स्वरूपात पैसे देणाºया व्यापाºयांसोबतच विक्र ी व्यवहार करावा. द्राक्ष खरेदी करण्यासाठी येणाºया व्यापाºयांचे आधारकार्ड व सक्षम ओळखपत्र याची व्यवस्थित खातरजमा करूनच शेतकºयांनी व्यवहार करावा, असे निर्णय यावेळी घेण्यात आले. बैठकीला उपसरपंच माधुरी फसाळे, कैलास भवर, संदीप भवर, संतोष परदेशी, विश्वास भवर, गोरख देवकर, रवींद्र परदेशी, सुयोग भोसले, सुरज भवर, कैलास मोरे, अंकुश भवर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.