खर्डे गावाचा सीमाबंदीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 09:58 PM2020-05-05T21:58:10+5:302020-05-05T23:16:56+5:30
खर्डे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील खर्डे गावाने मंगळवारी (दि. ५) ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावाच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाला गावकऱ्यांनी प्रतिसाद देत स्वागत केले आहे.

सध्या कोरोना या विषाणूचा मोठ्या शहरांपाठोपाठ ग्रामीण भागातदेखील फैलाव होत असल्याने दहशत निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील गावागावात सीमा बंद केल्या जात आहेत. याच धर्तीवर देवळा तालुक्यातील खर्डे गावाने मंगळवारी सरपंचाच्या उपस्थितीत बाजार आवारात बैठक घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन संपेपर्यंत सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी गावात बाहेरगावच्या लोकांना प्रवेश देऊ नये तसेच भाजीपाल्यासह सर्व छोट्या-मोठ्या दुकानदारांनी बाहेर गावातील येणाºया लोकांना कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची देवाण-घेवाण करू नये, गावातल्या वस्तू गावातच विक्री करणे, गावात कोणाकडे पाहुणे आले तर लागलीच ग्रामपंचायतीला व आरोग्य विभागाला कळविणे आदी महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मांडण्यात आले. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.