गुन्हा दाखल करण्याचा निर्णय
By admin | Published: February 14, 2017 12:02 AM2017-02-14T00:02:48+5:302017-02-14T00:02:58+5:30
ठेवीदार संतप्त : सिन्नर नागरी सहकारी पतसंस्था
सिन्नर : येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात रविवारी सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. ठेवीची मुदत संपल्यानंतरही पैसे
मिळत नसल्याने ‘सिन्नर नागरी’च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
हक्काचे पैसे मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत असताना सहकार खात्याकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वर्षभरापूर्वीच आॅडिट झाले तरी सभासदांना अद्याप त्याचा रिपोर्ट मिळत नसल्याबद्दल यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळास दोषी ठरवून त्यांच्या विरोधात सेवानिवृत्त अधिकारी श्रीकृष्ण शिरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेऊन एकत्रित लढा उभारण्याचे यावेळी ठरले.
बैठकीस सिन्नर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आर. डी. पवार, सुभाष जाजू, डॉ. जी. एल. पवार, कृष्णा क्षत्रिय, मु. शं. गोळेसर, तारा कट्यारे आदिंसह ठेवीदार उपस्थित होते. (वार्ताहर)