महापालिकेच्या महासभेचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 12:23 AM2020-05-18T00:23:43+5:302020-05-18T00:24:47+5:30
लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात कोणत्याही प्रकारची निर्बंध शिथिलता तर मिळाली नाहीच उलट जुनेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे येत्या बुधवारी महासभा घेण्यास परवानगी देतात किंवा नाही यावर सोमवारी (दि.१८) फैसला होणार आहे.
नाशिक : लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात कोणत्याही प्रकारची निर्बंध शिथिलता तर मिळाली नाहीच उलट जुनेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे येत्या बुधवारी महासभा घेण्यास परवानगी देतात किंवा नाही यावर सोमवारी (दि.१८) फैसला होणार आहे.
लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेची महासभा होऊ शकलेली नाही. कोरोनामुळे आरोग्याच्या सुरक्षिततचे नियम पाळण्यासाठी त्यांनी सभागृहात ही सभा न घेता चक्क कालिदास कलामंदिरात घेण्याचे नियोजन केले. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली असली तरी त्यांनी याबाबत महापालिका स्तरावर निर्णय घ्यावा, असे आयुक्त राधाकृष्ण गमे यांना कळवले आहे. त्यामुळे आता सभा घ्यावी किंवा नाही याचा सद्यस्थितीचा विचार करून आयुक्त गमे हे निर्णय घेणार आहेत.
महापालिकेत मात्र सभा घ्यावी किंवा नाही यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संचारबंदीत महासभेची घाई कशाला तसेच सभेच्या निमित्ताने दिवसभर अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी अडकवून ठेवणार काय? असे अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता आयुक्त त्यावर काय निर्णय घेतात याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागून आहे.