कांदा निर्यातीवर ५ टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय
By Admin | Published: August 27, 2016 11:42 PM2016-08-27T23:42:46+5:302016-08-27T23:43:00+5:30
कांदा निर्यातीवर ५ टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय
नाशिक : दिवसागणिक कांद्याचे कोसळणारे भाव पाहून केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मर्कंडाइज एक्स्पोर्ट्स फ्रॉम इंडिया स्कीम योजनेंतर्गत कांदा उत्पादकांना कांद्याच्या एकूण निर्यातीवर ५ टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारचे परराष्ट्र व्यापार महासंचालक अनुप वाधवान यांनी यासंदर्भात शनिवारी (दि. २६) एक परिपत्रक काढले आहे. त्यात मर्कंडाईज एक्स्पोर्ट्स फ्रॉम इंडिया स्कीम योजनेंतर्गत कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी या योजनेतील लेखाशीर्ष ३८ अन्वये ५ टक्केरक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याआधी द्राक्ष व अन्य फळांच्या निर्यातीवर ५ टक्केप्रोत्साहन भत्ता देण्यात येत होता. मात्र सध्या देशांतर्गत कांद्याच्या भावाची अवस्था वाईट झाल्याने कांद्याला पहिल्यांदाच निर्यातीवर ५ टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. (पान ७ वर)
कांदानिर्यातीवर ५ टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णययाचा फायदा आखाती देशांसह युरोपात कांदानिर्यात करणाऱ्या कांदा उत्पादकांना होण्याची चिन्हे आहेत. येत्या ३१ डिसेंबर पर्यंत ही योजना कांदा उत्पादकांसाठी लागू राहणार असल्याचे परराष्ट्र व्यापार महासंचालक अनुप वाधवान यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)