मीटरप्रमाणे रिक्षाभाडे आकारणीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:54 AM2019-11-24T00:54:21+5:302019-11-24T00:54:44+5:30
प्रवासी वाहतूक करताना प्रवाशांकडून मीटरप्रमाणे पैसे कमी आकारणी बंधनकारक असतानादेखील रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करताना मीटरप्रमाणे पैसे आकारत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
पंचवटी : प्रवासी वाहतूक करताना प्रवाशांकडून मीटरप्रमाणे पैसे कमी आकारणी बंधनकारक असतानादेखील रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करताना मीटरप्रमाणे पैसे आकारत नसल्याचे निदर्शनास आले आहे. रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून रिक्षाभाडे आकारणी नियमानुसार मीटरप्रमाणे करावी यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात शहरातील रिक्षा टॅक्सीचालक संघटना प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली.
सध्या शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल असून, त्याप्रमाणे रिक्षाचालक मालकांनी मीटरप्रमाणे रिक्षा भाडे आकारणी करावी अशा सूचना देण्यात आल्या. मीटरप्रमाणे भाडे आकारणी न करणाऱ्या रिक्षांची तपासणी करण्यात येऊन दि.१ डिसेंबरपासून रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे.
शहराच्या कार्यक्षेत्रात रिक्षा-टॅक्सी मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत असून, नियमानुसार इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले आहे. वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करताना मीटर कॅलिब्रेशन केल्याशिवाय नूतनीकरण होत नाही. रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे आकारणी करणार नाहीत त्यांच्याविरु द्ध कारवाई केली जाणार असून, प्रवाशांना तक्र ार करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बैठकीत प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी मार्गदर्शन करून रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे, अशा सूचना दिल्या. याशिवाय महिलांसाठी अबोली रिक्षाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या सहकार्याने मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नियमांचे पालन करण्याच्या सूचना
शहर परिसरातील अनेक रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे आकारणी करणार नाहीत त्यांच्याविरु द्ध कारवाई केली जाणार असून, प्रवाशांना तक्र ार करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बैठकीत प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी मार्गदर्शन करून रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे, अशा सूचना दिल्या.