गोदापात्रातील काँक्रिटीकरण प्रकरणी निर्णय हेच यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:31 AM2019-05-12T00:31:07+5:302019-05-12T00:31:34+5:30

गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करणे हे गोदाप्रेमींचे ध्येय असून, त्यासाठी गोदाप्रेमी सेवा समितीने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. गोदावरी ही स्वावलंबी नदी असून, त्याचे कारण म्हणजे रामकुंड परिसरात सतरा पुरातन कुंड आहेत,

 Decision-making in the Godavari concretization case is the achievement | गोदापात्रातील काँक्रिटीकरण प्रकरणी निर्णय हेच यश

गोदापात्रातील काँक्रिटीकरण प्रकरणी निर्णय हेच यश

googlenewsNext

संडे स्पेशल मुलाखत
गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करणे हे गोदाप्रेमींचे ध्येय असून, त्यासाठी गोदाप्रेमी सेवा समितीने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. गोदावरी ही स्वावलंबी नदी असून, त्याचे कारण म्हणजे रामकुंड परिसरात सतरा पुरातन कुंड आहेत, परंतु २००२-०३ मध्ये कुंभमेळ्याचे निमित्त करून कुंड बंदिस्त करून तळ कॉँक्रिटीकरण करण्यात आले. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. हे कॉँक्रिटीकरण करावे आणि पुरातन कुंडांचे पुनरुज्जीवन करावे यासाठी गोदाप्रेमी सेवा समिती प्रयत्न करीत होती. त्याला यश आले आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेने स्थापन केलेल्या कंपनीने प्रोजेक्ट गोदा राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गतच कॉँक्रिटीकरण काढण्यात येणार आहे. गेल्या चार ते पाच वर्षांच्या लढाईचे हे यश आहे, असे मत समितीचे अध्यक्ष देवांग जानी व्यक्त केले आहेत.
रामकुंड परिसरातील कुंडमुक्त करण्याची कल्पना कशी काय सुचली?
गोदावरी ही स्वयंभू आणि स्वावलंबी नदी आहे. रामकुंड परिसरात जे अनेक कुंड आज विभागले गेले आहेत. त्याखाली पुरातन कुंड, झरे आहेत. हे नैसगिक जलस्रोत आहेत. गोदावरी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत येते आणि येथे दक्षिणमुखी होते. त्याबरोबर अरुणा नदीशी तिचा संगम होतो. यामुळे येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो अशी अनेक शास्त्रीय कारणे आहेत. परंतु काळाच्या ओघात कुंड बंद झाले. तळ कॉँक्रिटीकरण करण्यात आल्याने नैसर्गिक स्रोत बंद झाल्याने गोदावरी परावलंबी झाली. कुंडांचे पुनरुज्जीवन म्हणजेच कॉँक्रिटीकरण हटविण्यासाठीच लढा दिला.
कुंडाच्या पुनरुज्जीवनासाठी कशी लढाई केली?
गोदावरीला काँक्रिटीकरण मुक्त करण्यासाठी आधी सर्व अभ्यास केला. इसवीसन १७००च्या सुमारास गोपिकाबाई पेशवे, अहिल्यादेवी होळकर अशा अनेक महान व्यक्तींनी त्या काळात येथे कुंड तयार केले होते. त्याचा अभ्यास करून अशी कुंडे कुठे आहेत, ते शोधून काढले. १७८३ मध्ये ब्रिटिशांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियरची मदत घेतली. ब्रिटिशांनी १९१७ मध्ये भूमी अभिलेख कार्यालय सुरू केले. त्यावेळी जमिनीचे जमा केलेले दस्तावेज तसेच नकाशे या सर्वांचीच मदत घेतली. याशिवाय जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग त्यांचीही मदत घेतली आणि मग या विषयाला हात घातला.
आता लढ्याला यश कसे मिळाले?
माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे या विषयासाठी पाठपुरावा केला. तेव्हा २०१७-१८ मध्ये तळ कॉँक्रिटीकरण हटविण्यासाठी त्यांनी अंदाजपत्रकात तरतूद केली होती. मात्र स्मार्ट सिटी कंपनीचा विषय पुढे आला त्यांनी थेट प्रोजेक्ट गोदाचा आराखडा तयार केला.
त्यासाठी समितीकडून अनेक दस्तावेज घेतले आणि त्यानुसार कामकाज सुरू केले आहे. यासंदर्भात दुसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या आहेत. महापालिकेचे सध्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली असून, त्यानुसार रामकुंड परिसरातील तळ कॉँक्रिटीकरण काढून कुंडाचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.
२००२-०३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी महापालिकेने तळ काँक्रिटीकरण केले खरे, परंतु त्यासंदर्भात मात्र मनपाकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली गेली. क्रॉँकिटीकरणाचा निर्णय कोणी व कसा घेतला, अशी माहिती मी माहितीच्या अधिकारात विचारली होती. परंतु त्याची माहिती देण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नाही, असे तांत्रिक कारण देण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे मी दाखल केलेल्या याचिकेत रामकुंडाच्या गोमुखातून भाविकांना शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपवली आहे.
उच्च न्यायालयात का जावे लागले?
महापालिका आणि जलसंपदा विभागाने यासंदर्भात अपेक्षित हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सर्व प्रकारची माहिती तपासून ही सर्व माहिती महापालिका आयक्तांकडे प्रेझेंटेशनद्वारे मांडण्याचे सुचविले. त्यानुसार पुन्हा एकदा प्रेझेंटेशनची तयारी केली. मविप्रच्या वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या प्रमुख प्राचार्या प्राजक्ता बस्ते यांनी त्यासाठी सहकार्य केले. त्यानंतर मग महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी प्रेझेंटेशन दिले. त्यांनी गोदावरी संवर्धन विभाग तयार केला आणि गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी सुरक्षारक्षक नियुक्त केले.

Web Title:  Decision-making in the Godavari concretization case is the achievement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.