बाजार समिती सभापतींचा निर्णय  काही तासांत मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 01:45 AM2021-05-14T01:45:19+5:302021-05-14T01:47:45+5:30

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नाशिक बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेवून काही तास उलटत नाही तोच पुन्हा निर्णय फिरविण्याची वेळ सभापतींवर आली आहे. 

The decision of the market committee chairperson was reversed in a few hours | बाजार समिती सभापतींचा निर्णय  काही तासांत मागे

बाजार समिती सभापतींचा निर्णय  काही तासांत मागे

Next

नाशिक:  शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नाशिक बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेवून काही तास उलटत नाही तोच पुन्हा निर्णय फिरविण्याची वेळ सभापतींवर आली आहे. 
 नाशिक जिल्ह्यात बाजार समितीत दैनंदिन विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी येतो. नाशिक बाजार समितीत पालेभाज्या, फळभाज्या, कांदा, लसूण, बटाटा, डाळिंब, आंबा विक्रीला येतो. बाजार समितीत रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमध्ये लॉकडाऊन केले. यात बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. बाजार समिती बंदमुळे शेतमाल नाशवंत होण्याची शक्यता असल्याने त्याची विल्हेवाट लावायची कशी, असे संकट शेतकऱ्यांसमोर उभे होते. यातून मार्ग काढण्यासाठी सभापती पिंगळे यांनी पालकमंत्री भुजबळ, जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याशी चर्चा करून शासकीय नियमांचे पालन करीत बाजार समिती सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अन्य बाजार समित्यांनीही असाच आग्रह धरण्यास सुरूवात केल्याने बाजार समितीचा निर्णय काही तासातच मागे घेण्यात आला आहे. गिरणारे येथे उपबाजार सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे सभापती पिंगळे यांनी सांगितले.

Web Title: The decision of the market committee chairperson was reversed in a few hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.