पिंगळे यांच्या घरच्या जेवणाबाबत सोमवारी निर्णय
By admin | Published: December 31, 2016 01:29 AM2016-12-31T01:29:17+5:302016-12-31T01:29:37+5:30
पिंगळे यांच्या घरच्या जेवणाबाबत सोमवारी निर्णय
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या बेहिशेबी रकमेप्रकरणी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असलेले बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांना घरचे जेवण मिळावे या अर्जावर सोमवारी (दि़२) निर्णय होणार आहे़ पिंगळे यांना घरचे जेवण मिळावे असा अर्ज त्यांच्या वकिलांना न्यायालयात सादर केला होता़
बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता तसेच वेतनातील फरक हा त्यांच्याकडून बळजबरीने धनादेशावर स्वाक्षरी करून बँकेतून काढून ती रक्कम पिंगळे यांना देण्यासाठी जात असलेल्या तिघा कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते़ या कर्मचाऱ्यांचे जबाब तसेच उपलब्ध पुराव्यानुसार पिंगळे यांना अटक करण्यात आली होती़ न्यायालयाने पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पिंगळे हे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहे़ दरम्यान, जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे़ दरम्यान, पिंगळे यांना घरचे जेवण मिळावे यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता़ त्यावर येत्या २ जानेवारीला निर्णय होणार आहे़ (प्रतिनिधी)