इपीएफ पेन्शनर्सचा आंदोलनाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:48 AM2018-02-25T00:48:18+5:302018-02-25T00:49:16+5:30
कोरिअर कमिटीने राज्यसभेवर दिलेले तीन हजार रु पये व महागाई भत्ता त्वरित द्यावा, इपीएफ पेन्शनर्सला पूर्णपणे वैद्यकीय सुविधा मोफत मिळाव्यात आदींसह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय आॅल इंडिया इपीएफ ९५ पेन्शनर्सच्या बैठकीत घेण्यात आला.
पंचवटी : कोरिअर कमिटीने राज्यसभेवर दिलेले तीन हजार रु पये व महागाई भत्ता त्वरित द्यावा, इपीएफ पेन्शनर्सला पूर्णपणे वैद्यकीय सुविधा मोफत मिळाव्यात आदींसह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्याल-यासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय आॅल इंडिया इपीएफ ९५ पेन्शनर्सच्या बैठकीत घेण्यात आला. औदुंबरनगर येथील सभागृहात आॅल इंडिया इपीएफ ९५ पेन्शनर्स फेडरेशन व नाशिक जिल्हा इपीएफ पेन्शनर्स फेडरेशन यांची संयुक्त बैठक सुरेश देसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून जिल्हा-धिकाºयांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर महागाई भत्ता, वैद्यकीय मोफत सेवा, अन्नसुरक्षा कायद्यात इपीएफ
पेन्शनर्सचा समावेश करावा, किमान साडेसहा हजार रुपये मासिक पेन्शन मिळावी, अशी मागणी केली आहे.
बैठकीचे प्रास्ताविक सेक्रे टरी डी. बी. जोशी यांनी केले. या बैठकीला सुधाकर गुजराती, अॅड. ई. एस. अशोकन, खजिनदार प्रकाश नाईक, दिंडोरी अध्यक्ष बाबासाहेब शिवले, प्रांत सेक्रे टरी पी. आर. पिल्ले, योगेश सहाणे आदींसह आॅल इंडिया इपीएफ ९५ पेन्शनर्स फेडरेशनचे सभासद उपस्थित होते.
इपीएफ पेन्शनर्सला फायदा मिळावा, सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करु न इपीएफओने काढलेले ३१/५/१७ चे सर्क्युलर रद्द करावे आदिंसह विविध मागण्यांसाठी येत्या मार्च महिन्यात ७ व ८ रोजी दिल्लीत धरणे आंदोलन करून मागण्या मान्य होण्यासाठी संसदेला घेराव घातला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.