संप सुरूच ठेवण्याचा नाशिकमध्ये निर्णय

By admin | Published: June 4, 2017 02:51 AM2017-06-04T02:51:24+5:302017-06-04T02:53:54+5:30

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री भेटून कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय परस्पर शेतकरी संप मागे घेण्याची घोषणा के ली

Decision in Nashik to continue the business | संप सुरूच ठेवण्याचा नाशिकमध्ये निर्णय

संप सुरूच ठेवण्याचा नाशिकमध्ये निर्णय

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकरी संपाचे आतापर्यंत केंद्र ठरलेल्या पुणतांबा येथील किसान क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीतील काही सदस्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री भेटून कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय परस्पर शेतकरी संप मागे घेण्याची घोषणा के ली. त्यावर नाशिकसह संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, नाशिकच्या शेतकऱ्यांनी यापुढेही संप सुरूच ठेवत यापुढे संपाची सूत्रे नाशिकमधून हलविण्याचा निर्णय घेतला आहे.
या संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी (दि. ४) दुपारी ४ वाजता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यस्तरीय बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे शेतकरी संपाचे नाशिकच मुुख्य केंद्र बनणार आहे. दरम्यान, बाजार समितीत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या भाजपाच्या खासदार व आमदारांना शेतकऱ्यांनी चर्चा न करताच पिटाळून लावले आहे.
मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीला उपस्थित असलेले जयाजीराव सूर्यवंशी यांनी शेतकरी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यापार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी नाशिकच्या शेतकरी नेत्यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमवेत काही शेतकरी नेत्यांची झालेली बैठक व त्यातून संपाबाबत पुढील भूमिका ठरविण्यावर चर्चा करण्यात आली. जयराज सुर्यवंशी यांना संप मागे घेण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल उपस्थित करीत सूर्यवंशी सरकारला फितूर झाल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. मात्र शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कोणत्याही नेत्यावर अथवा शेतकऱ्यांवर आरोप न करण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांकडून करण्यात आले. त्यावर शेतकऱ्यांनी भाजप सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला. याच वेळी बाजार समितीतील एका व्यापाऱ्याने आपले दुकान सुरू करून व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी संपामुळे दुकान बंद करण्याचे आवाहन केले. तथापि, शेतकऱ्यांनी संप मागे घेतला असून, मी पैसे देऊन शेतमाल खरेदी केला असल्याचे सांगत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त शेतकऱ्यांची व्यापाऱ्याचा दुकानातील शेतमाल फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला, पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर झाल्याचे सांगण्यात येत असले तरी नाशिकच्या शेतकऱ्यांनी यापुढेही संप सुरूच ठेवत संपाची सूत्रे नाशिकमधून हलविण्याचा निर्णय घेतला असून, सरकारच्या विरोधात शेतकरी व कार्यकर्त्यांनी अशी घोषणाबाजी केली.

Web Title: Decision in Nashik to continue the business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.