एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 08:15 PM2018-08-19T20:15:43+5:302018-08-19T20:16:28+5:30
येथे सोमवारी व एकादशीच्या दिवशी मांसविक्र ीची दुकाने बंद ठेवण्याचा प्रघात अनेक वर्षांपासून सुरू असून, त्याचे कसोशीने पालन करण्यात येते. यावर्षी बकरी ईद एकादशीच्या दिवशी आली असून, शहरातील मुस्लीम समाजबांधवांनी शहरात पाळली जाणारी परंपरा कायम ठेवत कुर्बानी एकादशीच्या दिवशी न ठेवता आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ठेवण्याचा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेऊन इतर समाजाच्या भावना जपत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
देवळा : येथे सोमवारी व एकादशीच्या दिवशी मांसविक्र ीची दुकाने बंद ठेवण्याचा प्रघात अनेक वर्षांपासून सुरू असून, त्याचे कसोशीने पालन करण्यात येते. यावर्षी बकरी ईद एकादशीच्या दिवशी आली असून, शहरातील मुस्लीम समाजबांधवांनी शहरात पाळली जाणारी परंपरा कायम ठेवत कुर्बानी एकादशीच्या दिवशी न ठेवता आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ठेवण्याचा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेऊन इतर समाजाच्या भावना जपत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. आगामी काळात येणाºया सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याच्या सभागृहात तालुक्यातील पोलीसपाटील, सरपंच, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नगरसेवक यांची बैठक घेण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यावेळी उपस्थित होते. गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन गावात मतदान घ्यावे व कायमस्वरूपी दारूबंदी करावी, उत्सव काळात मद्यपींचा उपद्रव थांबविण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करतील; परंतु यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे राहणार असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी यावेळी केले. बैठकीत उत्सव काळात वाद्यांच्या आवाजाची तीव्रता व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, ग्रामीण भागात अवैध देशी दारू विक्र ी तसेच गावठी दारूचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली. मद्यपींचा वाढता उपद्रव सध्या सर्वत्र चिंतेचा विषय झाला आहे. उत्सव काळात त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. शांतता प्रस्थापित होण्यासाठी मद्यपींवर कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
बैठकीस पंकज अहिरराव, सुनील पवार, नगरसेवक बाळासाहेब अहेर, प्रदीप अहेर, सगीरभाई शेख, बशीर शेख, आकील शेख, नईम शेख, रईस तांबोळी, कबीर तांबोळी, हेमंत पगार, काशीनाथ पवार, भाऊराव पवार, अनिता अहेर, सीमा अहिरे, अश्विनी बच्छाव, गंगाधर बच्छाव उपस्थित होते.