मातोरीमधील महिलांकडून मद्य विक्री होऊ न देण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 03:03 PM2019-12-26T15:03:04+5:302019-12-26T15:11:22+5:30
ग्रामसभेत मद्याचे दुकान न होऊ देण्यावर महिला ठाम असल्याने अखेर ग्रामपंचायत कडूनही यावर यावर दुकान न होऊ देण्याचा निर्णय घेतला
नाशिक : मातोरी गावातील ग्रामपंचायत मार्फत घेण्यात आलेल्या ग्रामसभेत मद्याचे दुकान न होऊ देण्यावर महिला ठाम असल्याने अखेर ग्रामपंचायत कडूनही यावर यावर दुकान न होऊ देण्याचा निर्णय घेतला.
गावातील विविध विषयावर नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहत गावातील पाणीपुरवठा नियोजन करण्याबाबत आपल्या अडचणी सांगितल्या. त्यानुसार पाणी व्यवस्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला तसेच गावात रस्ते कॉक्रिटीकरण करणे, गावातील कचऱ्याची विल्लेवाट व व्यवस्थापन करण्यासाठी घंटागाडी घेण्याचा प्रस्थाव घेण्यात आला. यावेळी गावात एका व्यवसायिकाकडून गावात मद्य विक्रीचे दुकान ठाकण्यासाठी लेखी प्रस्थाव ठेवण्यात आला होता. यावर वाचन होताच महिलांनी एकच गोंधळ क रत गावात कोणत्याही प्रकारचे मध्य विक्र ी होऊ दिली जाणार नसल्याचे सांगितले. त्याबाबत ग्रामपंचायत ने नकार न दिल्यास त्याचे वाईट परिणाम होतील असा इशारा दिल्याने अखेर ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी दुकान ना हरकत दाखला देण्यास नकार दिला. यावेळी गावातील सरपंच सुनिता दिलीप बर्वे, उपसरपंच अनिल लोखंडे, शरद तांदळे, पोलीस पाटील रमेश पिंगळे, दिलीप बर्वे, मीना धोंगडे, सुशीला ढेरिंगे, ग्रामसेवक भाऊसाहेब राजगुरू, राजाराम पिंगळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.