कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:13 AM2021-06-02T04:13:14+5:302021-06-02T04:13:14+5:30

नाशिक : कोरेाना संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्याने आता कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घेतला ...

Decision not to treat corona patients | कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय

कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय

Next

नाशिक : कोरेाना संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्याने आता कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घेतला आहे. शहरात सरकारी रुग्णालयांमध्ये कोरेाना बेड उपलब्ध असल्याने खासगी कोविड सेवा आपण बंद करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

याबाबत जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांवर उपचार केले आहेत. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत आजवर कोरोनावर उपचार करण्यात आले असून, यासाठी शहरातील खासगी रुग्णालयांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. गेल्या दीड वर्षापासून खासगी डॉक्टर्स कोरोना रुग्णसेवा करीत असून डॉक्टर्स तसेच कर्मचाऱ्यांवर ताणही आला आहे. त्यांना विश्रांतीची गरज असल्याने कोरोना रुग्णांवर तूर्तास उपचार करणार नसल्याचे म्हटले आहे.

कोरेाना संसर्ग आता बऱ्यापैकी आटोक्यात आला असून रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे सरकारी तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बऱ्यापैकी बेड उपलब्ध होत आहेत. त्यामुळे रुग्णांना या रुग्णालयांमध्ये उपचार मिळणे शक्य होणार असल्याने यापुढे खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करून घेणार नसल्याचे असोसिएशनने नमूद केले आहे. निवेदनावर हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, डॉ. सचिन देवरे, डॉ. राज नगरकर, डॉ. समीर अहिरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Decision not to treat corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.