द कश्मीर फाईल्ससाठी आंदोलनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 12:07 AM2022-03-16T00:07:45+5:302022-03-16T00:08:24+5:30

मालेगाव : शहर युवा मोर्चासह सिनेप्रेमींनी निवेदने देऊनही शहरातील चित्रपट गृहामध्ये द कश्मीर फाईल्स हा चित्रपट दाखविला जात नसल्याने येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात छावणी पोलीस निरीक्षक गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे.

Decision of agitation for acquisition of Hyad Kashmir files | द कश्मीर फाईल्ससाठी आंदोलनाचा निर्णय

द कश्मीर फाईल्ससाठी आंदोलनाचा निर्णय

Next
ठळक मुद्देभाजप पदाधिकाऱ्यांचा सवाल

मालेगाव : शहर युवा मोर्चासह सिनेप्रेमींनी निवेदने देऊनही शहरातील चित्रपट गृहामध्ये द कश्मीर फाईल्स हा चित्रपट दाखविला जात नसल्याने येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात छावणी पोलीस निरीक्षक गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे.

मालेगाव शहरवासीयांना इतिहासाची माहिती देणाऱ्या चित्रपटापासून वंचित ठेवण्याचे काम सध्या चालू आहे. जो सिनेमा पूर्ण भारतात प्रदर्शित होतो, परंतु मालेगाव शहरात हेतुपुरस्सर लावला जात नाही. या सिनेमाशी भारतीयांच्या भावना जोडल्या गेल्या असून, प्रत्येक भारतीयाच्या मनात तो बघण्याच्या इच्छा जागृत झाली आहे. त्या भावना दाबण्याचे काम मालेगाव शहरातील सिनेमा गृह व प्रशासन करीत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

हा चित्रपट न दाखविल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, मंजुषा कजवाडकर, हरिप्रसाद गुप्ता, भरत पोफळे, देवा पाटील, हेमंत पुरकर, सुधीर जाधव, देविदास कुवर, सुनील शेलार, पप्पू पाटील, श्याम गांगुर्डे, राहुल पाटील, शक्ती सोर्दे, सचिन बाचकर आदींनी दिला आहे.

Web Title: Decision of agitation for acquisition of Hyad Kashmir files

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.