मंदिरे उघडण्याच्या निर्णयाचे सटाण्यात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:43 PM2020-11-19T23:43:48+5:302020-11-20T01:23:10+5:30
कंधाणे : मार्च महिन्यातील लॉकडाऊनपासून भाविकांसाठी बंद करण्यात आलेली मंदिरे उघडण्यास सरकारने सोमवारी (दि. १६) पाडव्याच्या मुहूर्तावर परवानगी दिली. या निर्णयाचे भारतीय जनता पार्टी बागलाणच्या वतीने पेढे वाटून स्वागत व जल्लोष करण्यात आला.

खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हा अध्यक्ष सुरेश निकम, तालुका अध्यक्ष संजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष नीलेश पाकळे, राकेश घोडे, सुरेश सोनवणे, मंगेश खैरनार, जीवन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सटाणा येथील भाक्षी रोडवरील साईबाबा मंदिराचा दरवाजा उघण्यात येऊन साईबाबा मंदिरराचे सेवेकरी जाधव बाबा व त्यांच्या पत्नी यांच्या हाताने साईबाबा मूर्तीची विधिवत मंत्रोच्चारात पूजा करून त्यांचा सत्कार करून पेढे वाटण्यात आले.
यावेळी तालुका सरचिटणीस दिलीप खैरनार, चंद्रकांत जाधव, उपाध्यक्ष देवेंद्र पवार, गौरव बिरारी, भास्कर पगार, सुनील पाटील, तालुका युवा विद्यार्थी सागर कुमावत, ईश्वर कुमावत, मुकेश पगारे, विशाल कोळी, प्रकाश अहिरे, पुष्कर पगारे, ज्ञानेश्वर खैरनार, निखिल खैरनार, मयूर खैरनार, सोनू हिरे, दत्ता सोनवणे, अनिल परदेशी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.