‘भारत बंद’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:10 AM2020-12-07T04:10:13+5:302020-12-07T04:10:13+5:30
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलो’ची हाक दिली होती. पंजाब आणि हरियाणातून शेतकरी मोठ्या संख्येने राजधानी दिल्लीत प्रवेश ...
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलो’ची हाक दिली होती. पंजाब आणि हरियाणातून शेतकरी मोठ्या संख्येने राजधानी दिल्लीत प्रवेश करण्यासाठी धडकले आहेत. दिल्ली पोलिसांनी प्रवेश नाकारल्याने परिस्थिती चिघळली. शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष सुरू झाला. शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (दि.८ ) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये सातपूरच्या शेतकऱ्यांसह व्यापारी व्यावसायिकांनी सहभागी करून घेण्यासाठी सातपूर गावात बैठक घेण्यात आली. बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे तसेच दौलत निगळ, नितीन निगळ, शशी घाटोळ, हेमंत मौले, विजय भंदुरे, चेतन भंदुरे, त्र्यंबक भंदुरे, कांतीलाल भंदुरे, छगन भंदुरे, रवी काश्मिरे, गोरक्ष सोनवणे, मच्छिंद्र भंदुरे, नीलेश भंदुरे, भिवानंद काळे, दीपक मौले, सुरेश गोवर्धने, सुनील निगळ, रामनाथ मौले, विलास घाटोळ आदींसह ग्रामस्थ, व्यापारी उपस्थित होते.
फोटो :- सातपूर गावात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे. समवेत दौलत निगळ, नितीन निगळ, शशी घाटोळ, हेमंत मौले, विजय भंदुरे, त्र्यंबक भंदुरे, कांतीलाल भंदुरे, छगन भंदुरे, रवी काश्मिरे, गोरक्ष सोनवणे, नीलेश भंदुरे, भिवानंद काळे, दीपक मौले, सुरेश गोवर्धने, सुनील निगळ, रामनाथ मौले, विलास घाटोळ आदींसह ग्रामस्थ.
Attachments area