मका, ज्वारी खरेदीचा निर्णय :छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:23 PM2020-05-09T22:23:01+5:302020-05-10T00:47:33+5:30

नाशिक : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

 Decision to purchase maize, sorghum: Chhagan Bhujbal | मका, ज्वारी खरेदीचा निर्णय :छगन भुजबळ

मका, ज्वारी खरेदीचा निर्णय :छगन भुजबळ

googlenewsNext

नाशिक : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
लॉकडाउनमुळे कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये मंदी आल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. मात्र केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीसाठी परवानगी देण्यात आल्यामुळे राज्यातील मका व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक जिल्ह्णांमध्ये मका आणि रब्बीची जास्त प्रमाणात लागवड केली जात असल्याने रब्बीमध्ये शासनाने भरड धान्याची खरेदी करावी, अशी लोकप्रतिनिधींची मागणी होती. त्याअनुषंगाने भरड धान्याची खरेदी करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.  किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून, हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये यासाठी ही योजना आहे़ राज्य शासनाने नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्थामार्फत बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-आॅप. मार्केटिंग फेडरेशन मुंबई व आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात एफएक्यू दर्जाच्या ज्वारी व मक्याची खरेदी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार त्या-त्या जिल्ह्णात खरेदी संस्थांच्या माध्यमातून आवश्यक त्या ठिकाणी खरेदी केंद्र उभारण्यात येणार असून, मका व ज्वारीची आधारभूत किमतीने खरेदी करण्यात येणार आहे.
----------
सात दिवसांत निधी खात्यात
अभिकर्ता संस्था व त्यांच्या मुख्यालयातून थेट शेतकºयांच्या खात्यामध्ये खरेदी केलेल्या भरडधान्यांची रक्कम अदा करण्यात येणार आहे. ही रक्कम खरेदी केलेल्या दिवसापासून सात दिवसांच्या आत शेतकºयांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Web Title:  Decision to purchase maize, sorghum: Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक