एमआयडीच्या गाळ्यांचे दर कमी करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:15 AM2020-12-31T04:15:27+5:302020-12-31T04:15:27+5:30
औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये गाळ्याचे दर निश्चित करण्यात आले होते, परंतु हे जास्तीचे असल्याने गाळे विक्रीस अपेक्षित ...
औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये गाळ्याचे दर निश्चित करण्यात आले होते, परंतु हे जास्तीचे असल्याने गाळे विक्रीस अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एमआयडीसीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अनबनगल नाशिक दौऱ्यावर आले असता, औद्योगिक संघटनांच्या बैठकीत गाळयांचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. सदर गाळ्यांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे व गाळयाच्या बांधकामावरील घसारा, देखभाल दुरुस्ती व सुरक्षा इत्यादी बाबीवर होणारा खर्च, तसेच महामंडळाची साधनसामुग्री विनावापर पडून राहत आहे. याचा विचार करून एमआयडीसी संचालक मंडळाच्या बैठकीत १० रुपये प्रति चौरस फूट दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चौकट===
उद्योग मित्र संस्थेच्या वतीने गाळ्यांचे दर कमी करावेत, म्हणून सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर दर कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. यामुळे एक हजार चौरस फुटाचा गाळा घेणाऱ्या उद्योजकाचा कमीतकमी ४ ते ५ लाख रुपयांचा फायदा होणार आहे. उद्योग मित्र संस्थेचा लढा यशस्वी ठरला आहे.
- प्रदीप पेशकार, अध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी