दायित्वाच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:16 AM2021-07-31T04:16:01+5:302021-07-31T04:16:01+5:30

मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी निधीची तरतूद नसताना दायित्व वाढविणाऱ्या कामांच्या प्रशासकीय मान्यता तपासण्यात याव्यात, तसेच कुठल्या वर्षी ...

Decision to revoke administrative recognition of liability | दायित्वाच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय

दायित्वाच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय

googlenewsNext

मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी निधीची तरतूद नसताना दायित्व वाढविणाऱ्या कामांच्या प्रशासकीय मान्यता तपासण्यात याव्यात, तसेच कुठल्या वर्षी निधी मिळाला व कोणत्या कामाला मिळाला याचा अभ्यास करून दायित्व वाढत असेल, तर अशा मान्यता रद्द कराव्यात, अशा सूचना दिल्या, तसेच एक रुपयाही निधी मिळत नसेल, तर अशा कामांच्या प्रशासकीय मान्यता का ठेवतात, अशी विचारणा बांधकाम विभागाला केली, तर संजय बनकर यांनी यासंदर्भात बांधकाम समितीने या सर्व प्रकरणाची चौकशी करून प्रशासकीय मान्यता रद्द करावी, अशी सूचना केली. या सभेस उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.

चौकट==

एका महिन्यात आरोग्य केंद्राला गळती

दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची १९ लाख रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली. मात्र, अवघ्या महिनाभरातच तिला गळती लागली आहे. याबाबत छाया गोतरणे यांनी तक्रार केली असता, सदर कामाची चौकशी करण्याच्या सूचना आरोग्य व बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.

Web Title: Decision to revoke administrative recognition of liability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.