सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 01:09 AM2021-04-09T01:09:26+5:302021-04-09T01:10:57+5:30
राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेल्या ‘ब्रेक द चेन’च्या निर्णयात बदल करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी सरकारकडून दोन दिवसांचा वेळ मागण्यात आला आहे. त्यामुळे सरकारच्या आश्वासनानुसार शुक्रवारी दुकाने सुरू करण्याचा निर्णय स्थगित करून सोमवारपासून व्यापार सुरळीत सुरू करण्याचा ठराव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
नाशिक : राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेल्या ‘ब्रेक द चेन’च्या निर्णयात बदल करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी सरकारकडून दोन दिवसांचा वेळ मागण्यात आला आहे. त्यामुळे सरकारच्या आश्वासनानुसार शुक्रवारी दुकाने सुरू करण्याचा निर्णय स्थगित करून सोमवारपासून व्यापार सुरळीत सुरू करण्याचा ठराव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर तर्फे गुरुवारी ‘ब्रेक द चेन व व्यापार बंद’ विषयावर राज्यातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी व सभासदांची ऑनलाइन बैठक झाली. बैठकीत चेंबरचे उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर, अनिलकुमार लोढा, नाशिक शाखा चेअरमन
संजय दादलिका, पुणे व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद राका, अमरावतीचे विनोद कलंत्री, कोल्हापूरचे संजय शेटे, सोलापूरचे राजू राठी, कमलेश धूत, पोपटलाल ओस्तवाल, हर्षवर्धन संघवी, अश्विन मेहाडिया आदी पदाधिकारीसह व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाची दोन दिवस वाट बघावी, असे मत मांडले. त्यामुळे शुक्रवारी दुकाने न उघडता सोमवारपासून दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चेंबरकडून सांगण्यात आले आहे. ललित गांधी यांनी आभार मानले. बैठकीत कॅटचे उपाध्यक्ष मेहुल थोरात, अजित सुराणा, प्रवीण पगारिया, मुस्ताक शेख, सागर नागरे, विनी दत्ता आदीसह मोठ्या प्रमाणात व्यापारी सहभागी झाले होते.