बेकायदेशीर स्कूल बसेसवर कारवाई करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:19 AM2019-05-23T00:19:10+5:302019-05-23T00:19:31+5:30

प्रादेशिक परिवहन विभाग तसेच जिल्हा वाहतूक शाखेकडून अचानक स्कूल बसची पाहणी करून पडताळणी करतील. या पाहणी दरम्यान नियमांचे उल्लंघन केलेले आढळून आल्यास संबंधित बेकायदेशीर स्कूल बसवर प्रादेशिक परिवहन विभाग तसेच जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीच्या वतीने कारवाई केली जाईल,

 Decision to take action against illegal school buses | बेकायदेशीर स्कूल बसेसवर कारवाई करण्याचा निर्णय

बेकायदेशीर स्कूल बसेसवर कारवाई करण्याचा निर्णय

Next

पंचवटी : प्रादेशिक परिवहन विभाग तसेच जिल्हा वाहतूक शाखेकडून अचानक स्कूल बसची पाहणी करून पडताळणी करतील. या पाहणी दरम्यान नियमांचे उल्लंघन केलेले आढळून आल्यास संबंधित बेकायदेशीर स्कूल बसवर प्रादेशिक परिवहन विभाग तसेच जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीच्या वतीने कारवाई केली जाईल, असा निर्णय आडगाव पोलीस मुख्यालयात मंगळवारी झालेल्या जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीची ग्रामीण भागासाठी पहिली बैठक आडगाव पोलीस मुख्यालयातील बहुद्देशीय सभागृहात पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीचे सचिव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहसचिव किरण बिडकर, पोलीस निरीक्षक अनंत तारगे, नरेंद्र भदाणे आदींसह मालेगाव तसेच जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील विविध शाळांचे मुख्याध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य, विविध संस्था प्रतिनिधी जिल्हा परिषद, पंचायत समिती शाळा सदस्य तसेच स्कूल बस मॅनेजर, चालक, मालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना आरती सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी जिल्हा स्कूलबस सुरक्षा समिती निर्माण करण्यात आली असल्याचे सांगितले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस सुस्थितीत पाहिजेत व चालक निर्व्यसनी आणि अनुभवी असावेत असे सांगितले. येणाºया अडचणींबाबत चर्चा करून सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. प्रादेशिक परिवहन विभाग, ग्रामीण पोलीस विभाग यांच्याकडून अचानक स्कूलबस पाहणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसवू नये तसेच प्रत्येक शालेय समितीने वेळोवेळी आढावा बैठक घेऊन बैठकीचा आढावा स्कूलबस सुरक्षा समितीला द्यावा, असे स्पष्ट आदेश देण्यात आले.

Web Title:  Decision to take action against illegal school buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.