काम वाटपाच्या कामांची शहानिशा करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:46+5:302021-07-03T04:10:46+5:30

यावर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनीही आपली भावना व्यक्त करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या अधिकाराचा हा प्रश्न ...

Decision to verify work allocation work | काम वाटपाच्या कामांची शहानिशा करण्याचा निर्णय

काम वाटपाच्या कामांची शहानिशा करण्याचा निर्णय

googlenewsNext

यावर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनीही आपली भावना व्यक्त करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या अधिकाराचा हा प्रश्न असून, जिल्हा परिषदेने एकदा घेतलेला निर्णय परस्पर बदलण्याचे कारण काय, असा सवाल केला. जिल्हा परिषदेच्या सर्व खात्यांचे कामकाज समाधानकारक सुरू असताना बांधकाम विभागामुळे जिल्हा परिषदेचे नाव खराब होत आहे, त्यामुळे काम वाटपात करण्यात आलेल्या सर्व कामांची शहानिशा करावी, असे आदेश दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीही यात जिल्हा परिषदेच्या ठरावाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात आली असून, काम वाटप करताना ठेकेदारांनी काम पूर्णत्वाचा दाखला जोडला नसल्यास त्याची शहानिशा करण्यात येईल, अशी ग्वाही दिली व सर्व कागदपत्रांची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन दिले. प्रशासन व लोकप्रतिनिधी समन्वयाने काम करतील, असे सांगितले.

Web Title: Decision to verify work allocation work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.