रोखीने द्राक्षमाल विक्र ीचा निश्चय लासलगाव : शिवडी सारोळे ग्रामस्थांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:04 AM2018-03-02T00:04:56+5:302018-03-02T00:04:56+5:30
लासलगाव : शिवडी सारोळे ग्रामस्थांनी रोखीने द्राक्षमाल विक्र ीचा निश्चय केला आहे . त्यानुसार सर्वत्र द्राक्ष उत्पादकांनी गावागावांत संघटन अधिक मजबूत करावे.
लासलगाव : शिवडी सारोळे ग्रामस्थांनी रोखीने द्राक्षमाल विक्र ीचा निश्चय केला आहे . त्यानुसार सर्वत्र द्राक्ष उत्पादकांनी गावागावांत संघटन अधिक मजबूत करावे त्यातून द्राक्षशेतीतील धोके टळतील यासाठी उगाववासीयांनी घेतलेला निर्णय जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन द्राक्ष बागायतदार संघाच्या मध्यवर्ती विज्ञान समितीचे चेअरमन कैलास भोसले यांनी केले. शिवडीसह सारोळे येथील शेतकºयांनी सुरू केलेल्या रोखीच्या द्राक्षमाल विक्रीच्या ठरावाबाबत उगाव येथे आयोजित द्राक्ष उत्पादकांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्रगतशील द्राक्ष उत्पादक शांताराम पानगव्हाणे होते. लासलगाव बाजार समितीचे माजी संचालक प्रभाकर मापारी यांनी प्रास्ताविकात द्राक्ष उत्पादकांनी संघटित होण्यासाठी शिवडी सारोळेकरांचा आदर्श घेण्याची गरज विशद केली. याप्रसंगी बोलताना अनेक लोकांची आजवर द्राक्षमालाच्या व्यवहारात कोट्यवधींची फसवणूक झाली, त्यामुळे द्राक्षमालाच्या व्यवहाराबाबत रोखीची सक्ती अन् दोन टक्के कपातीला विरोध या निर्णयावर सर्व उगावकर ठाम राहणार आहेत.