शिवसेनेची याचिका निकाली, आता आयुक्तांकडे फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:23 AM2019-03-12T01:23:03+5:302019-03-12T01:23:37+5:30
महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादाचे निराकरण करण्यासाठी उच्च न्यायालयात शिवसेनेने दाखल केलली याचिका अद्याप निकाली काढण्यात आली
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादाचे निराकरण करण्यासाठी उच्च न्यायालयात शिवसेनेने दाखल केलली याचिका अद्याप निकाली काढण्यात आली असून, आता या वादाचा फैसला विभागीय आयुक्तांच्या कोर्टात होणार आहे. मंगळवारी (दि.१२) यासंदर्भात महापौर, नगरसचिव तसेच सर्व गटनेते आणि आयुक्तांना सकाळी ११ वाजता त्यांची बाजू मांडण्यासाठी बोलविण्यात आले आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्तीवरून हा वाद सुरू झाला आहे. भाजपाचे महापालिकेत एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत असलेले पक्षीय तौलनिक संख्याबळ हे सातपूर येथील सुदाम नागरे या नगरसेवकाच्या निधनामुळे घटले आहे. साहजिकच स्थायी समितीत भाजपाच्या नऊ ऐवजी आठ सदस्य होतात आणि त्यांची कमी झालेली एक जागा शिवसेनेला मिळते त्यामुळे यापक्षाचे स्थायी समितीत पाच सदस्य होतात, असा विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते आणि गटनेता विलास शिंदे यांचा दावा आहे. यासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
तर सेना पुन्हा न्यायालयात दाद मागणार
उच्च न्यायालयाने यापूर्वी याचिका दाखल करून घेतल्याने शिवसेनेला मोठी अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने याचिका निकाली काढली गेली आहे. अर्थात, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्या दाव्यानुसार याचिका निकाली काढली गेलेली नाही. विभागीय आयुक्तांकडून समाधानकारक निर्णय झाला नाही तर उच्च न्यायलयात दाद मागता येऊ शकते.