ढोल ताश्यांच्या गजरात गणरायाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 01:32 PM2018-09-24T13:32:39+5:302018-09-24T13:32:53+5:30
त्र्यंबकेश्वर : निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी,आभाळ भरले होते तु येताना, आता डोळे भरु न आलेत तुला पाहुन जाताना’ बाप्पा माझ्या जीवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे...तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहु दे. त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव...अशी प्रार्थना आणि ‘गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत ढोल ताश्यांच्या गजरात गुलालाची उधळण करीत मिरवणुकीद्वारे विसर्जन करु न बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

येथे या वर्षी डीजे मुक्त वातावरणात तथापि ढोल ताशा बँड व वाजंत्रींच्या गजरात मिरवणुक निघाली होती. तसेच गावातील विविध गणेश मंडळांच्या चौकात ठिकाणी बसविलेल्या गणरायाची मिरवणुक काढण्यात आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशा वाजंत्रीच्या तालात देखील ताल धरला होता. गावातील २५ लहान मोठ्या मंडळांचे गणेश सायंकाळपासुन ते रात्री पोलिसांनी निश्चित केलेल्या वेळेपुर्वीच विसर्जन आटोपण्यात आले. विशेष म्हणजे अशा वाद्यांवर देखील मंडळांच्या कार्यकर्त्यांनी समाधान मानुन घेतले. मृत्युंजय प्रतिष्ठान त्र्यंबकचा राजा प्रचितीराज सांस्कृतिक कला गणेश मित्र मंडळ भगवती मित्र मंडळ वगैरे गणेश मंडळाच्या मिरवणुका सहा वाजता निघाल्या होत्या. तर नवशक्ती मित्र मंडळाचा गणपती सर्वात अगोदर म्हणजे चार वाजताच मिरवणुक काढण्याचा दरवर्षीचा पायंडा संस्थापक अध्यक्ष ललित लोहगावकर यांनी पाळला. विसर्जन तलावावर नगरपालिकेन मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील एक मंडप टाकुन गावातील खाजगी गणेश मुर्ती, सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन करावयाच्या मुर्ती दान करण्या बाबत लोकांना प्रवृत्त करण्यात येत होते. पीओपी गणेश मुर्ती आणि शाडुच्या मुर्ती पर्यावरणाचा समतोल अबाधित रहावा. पाण्यात विरघळणा-या मुर्तीचेच फक्त विसर्जन झाले पाहिजे. नगर परिषदेची स्वच्छ सर्वेक्षण २०१९ ही स्वच्छता मोहीम सध्या शहरात सुरु आहे. यासाठी पालिकेचे कर्मचारी अधिकारी पदाधिकारी या मोहीमेत हिरीरीने उतरले आहेत.