येवल्याच्या राजवस्र पैठणीला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:53 AM2017-07-23T00:53:39+5:302017-07-23T00:53:50+5:30

येवला : शहराची आर्थिक बाजारपेठ अवलंबून असणाऱ्या पैठणीला जीएसटीमुळे उतरती कळा लागली असून, कच्च्या मालाच्या किमतीवर जीएसटी लागू झाल्याने विणकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Declaration of the fall of Yavlia's palace Paithani | येवल्याच्या राजवस्र पैठणीला उतरती कळा

येवल्याच्या राजवस्र पैठणीला उतरती कळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : शहराची आर्थिक बाजारपेठ अवलंबून असणाऱ्या पैठणीला जीएसटीमुळे उतरती कळा लागली असून, कच्च्या मालाच्या किमतीवर जीएसटी लागू झाल्याने विणकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. व्यापारी उत्पादकाने विकलेल्या पैठणीला जीएसटी लागू करून पैठणीचे  भाव वाढवून देत नसल्याने विणकरांची दुहेरी कुचंबणा सुरू झाली आहे.पैठणी विणकर संघटित नसल्याने व्यापारी याचा फायदा घेत असल्याची चर्चा सध्या विणकर बांधवांमध्ये ऐकायला मिळत आहे. त्यामुळे पैठणीवर लागू केलेला जीएसटी कर रद्द करावा किंवा उत्पादकाने विकलेल्या पैठणीवर जीएसटी लागू करून भाव द्यावा, अशी मागणी विणकर करत आहेत. याबाबत विणकरानी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले आहे. महाराष्ट्राच्या तत्कालीन शासनकर्त्यांनी यादव साम्राज्य व पेशवे काळात पैठणी महावस्राला राजाश्रय होता म्हणूनच हे महावस्र आजही टिकाव धरून आहे. ही कला टिकावी म्हणून सन १९८० मध्ये बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना नाशिक जिल्ह्यातील येवला व औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील विणकर बांधवांच्या विनंतीवरून शासनाने पैठणीकरिता लागणाऱ्या कच्च्या मालावरील सर्व प्रकारचे कर  विशेष बाब म्हणून लागू केलेले  नव्हते. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारांनी वेळोवेळी पैठणी टिकावी व विणकर जगावा म्हणून अनुदान देणे अथवा विविध योजना राबविण्यासारखे अनेक प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे युनेस्कोने या महावस्र पैठणीला वर्ल्ड हेरिटेज आयकॉन दिला आहे.

Web Title: Declaration of the fall of Yavlia's palace Paithani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.