सटाण्याचे तहसीलदार सैंदाणे निलंबित विधिमंडळात घोषणा : आमदारांचा हक्कभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:24 AM2017-12-22T00:24:37+5:302017-12-22T00:31:44+5:30
नाशिक : सटाण्याचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या हक्कभंग प्रस्तावावर विधिमंडळ अधिवेशनात चर्चा होऊन अखेर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सैंदाणे यांना निलंबित केल्याची घोषणा केली आहे. सैंदाणे यांनी सटाण्याचे आमदार दीपिका चव्हाण यांना अवमानकारक वागणूक दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
नाशिक : सटाण्याचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या हक्कभंग प्रस्तावावर विधिमंडळ अधिवेशनात चर्चा होऊन अखेर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सैंदाणे यांना निलंबित केल्याची घोषणा केली आहे. सैंदाणे यांनी सटाण्याचे आमदार दीपिका चव्हाण यांना अवमानकारक वागणूक दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शासकीय बैठकांना स्थानिक आमदारांना आमंत्रित न करणे, लोकप्रतिनिधींनी बोलविलेल्या बैठकींना गैरहजर राहणे, शासकीय माहिती न देणे आदी कारणांवरून आमदार दीपिका चव्हाण यांनी विधीमंडळाच्या हक्कभंग समितीकडे तक्रार केली होती. गेल्या अधिवेशनातही हक्कभंग समितीकडे तहसीलदार सुनील सैंदाणे यांचे प्रकरण प्रलंबित होते. तथापि, पावसाळी अधिवेशनात हक्कभंग चर्चेला आला नाही. हिवाळी अधिवेशनात मात्र कामकाजात हा विषय घेण्यात आला होता व गुरुवारी राष्टÑवादीचे आमदार अजित पवार यांनी हा विषय पटलावर ठेवला. अधिकाºयांकडून लोकप्रतिनिधींचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिल्यावर सर्वच विरोधी पक्षांच्या आमदारांनी पवार यांच्या सुरात सूर मिसळविल्याने अखेर महसूलमंत्र्यांनी अधिवेशनातच सैंदाणे यांना निलंबित करीत असल्याची घोषणा केली.