कळवणमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 10:04 PM2020-08-07T22:04:44+5:302020-08-08T01:02:39+5:30
कळवण, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व शेजारील तालुक्यांमध्ये मुख्यत: भात व नागली, वरई ही पिके घेतली जातात. मात्र पावसाअभावी ती संकटात आली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह कळवण, सुरगाणा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व आदिवासी शेतकऱ्यांच्या पीकरोपांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व दुष्काळी कामे त्वरित सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
कळवण : कळवण, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व शेजारील तालुक्यांमध्ये मुख्यत: भात व नागली, वरई ही पिके घेतली जातात. मात्र पावसाअभावी ती संकटात आली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह कळवण, सुरगाणा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व आदिवासी शेतकऱ्यांच्या पीकरोपांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व दुष्काळी कामे त्वरित सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कोरोनाच्या विळख्यात सापडलेला असताना पावसाने पाठ फिरवली, पावसाअभावी पिके करपू लागली असून, शासनस्तरावरून पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, हिरामण खोसकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. आमदार पवारांनी कळवण, सुरगाणा तालुक्यातील दुष्काळसदृश स्थितीमुळे आदिवासी बांधवांचे आर्थिक गणित कोलमडल्यामुळे नाशिक जिल्ह्यासह कळवण, सुरगाणा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या फैलावामुळे देशासह महाराष्ट्र राज्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. संचारबंदीमुळे व पावसाने पाठ फिरविल्याने सुरगाणा तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. सुरगाणा तालुक्यातील मुख्य पीक भात असून, ते पूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाअभावी भात शेतीची लागवड २५ टक्केसुद्धा झालेली नाही अणि जी लागवड बाकी आहे ती रोपे जवळपास ९० दिवसांच्या वर वाढ झाल्याने पाण्याअभावी करपू लागली आहेत. रब्बी पिकेही जमीनदोस्त होत आहेत. कळवण व सुरगाणा मतदारसंघातील माळरानात डोंगरमाथ्यावर भुईमूग, वरई, नागली ही पिके घेतली जातात; मात्र अपुºया पावसामुळे पिके करपून उद्ध्वस्त झाली आहेत. काबाडकष्ट करणारा शेतकरी आधीच कोरोनाच्या विळख्यात सापडला असून, लॉकडाऊनमुळे मोलमजुरीचे दरवाजेही बंद झाले आहे. त्यात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक कोंडीत सापडला आहे.