येवल्यात भुसार धान्य आवकेत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:19+5:302021-07-12T04:10:19+5:30

सप्ताहात गहू, बाजरी, हरभरा, सोयाबीन, मका यांच्या आवकेत घट झाली. स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत भुसार धान्याला मागणी सर्वसाधारण ...

Decline in Bhusar grain imports in Yeola | येवल्यात भुसार धान्य आवकेत घट

येवल्यात भुसार धान्य आवकेत घट

Next

सप्ताहात गहू, बाजरी, हरभरा, सोयाबीन, मका यांच्या आवकेत घट झाली. स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत भुसार धान्याला मागणी सर्वसाधारण राहिल्याने गहू, बाजरी, हरभरा यांचे बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. सोयाबीन बाजारभाव मात्र तेजीत, तर मक्याच्या बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले.

सप्ताहात गव्हाची आवक २० क्विंटल झाली असून बाजारभाव किमान रु. १६३६ ते कमाल रु. १७१२, तर सरासरी रु. १६९१ पर्यंत होते. सप्ताहात बाजरीची आवक ५९ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. १५०० ते कमाल रु. १५५१, तर सरासरी रु.१५२२ पर्यंत होते. हरभऱ्याची आवक ११ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान रु. ३३३३ ते कमाल रु.४५९९, तर सरासरी रु. ४१५१ पर्यंत होते.

सोयाबीनची आवक १४ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. ४५०० ते कमाल रु.७७००, तर सरासरी रु. ७३९१ पर्यंत होते. मक्याची आवक ३३ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. १७०० ते कमाल रु. १८३३, तर सरासरी रु. १८१६ प्रतिक्विंटलपर्यंत होते.

Web Title: Decline in Bhusar grain imports in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.