येवला तालुक्यात कापूस, मक्याच्या क्षेत्रात घट; सोयाबीन, बाजरीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 09:27 PM2020-06-17T21:27:43+5:302020-06-18T00:33:40+5:30

येवला : तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण ५९ हजार २०० हेक्टर क्षेत्र असताना गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रात वाढ होत गेल्याने सध्या ७९, ६८७ हेक्टर खरीप क्षेत्र झाले आहे. तर कृषी विभागाने खरीप क्षेत्राचा लक्षांक ८८ हजार ५६३ हेक्टर ठेवला आहे. यंदा तालुक्यात खरिपातील पीक पॅटर्नमध्ये बदल होत असून कापूस, मका क्षेत्रात घट होऊन सोयाबीन, बाजरी क्षेत्रात वाढ होणार असल्याचे चित्र आहे.

Decline in cotton and maize area in Yeola taluka; Soybeans, market growth | येवला तालुक्यात कापूस, मक्याच्या क्षेत्रात घट; सोयाबीन, बाजरीत वाढ

येवला तालुक्यात कापूस, मक्याच्या क्षेत्रात घट; सोयाबीन, बाजरीत वाढ

Next

येवला : तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण ५९ हजार २०० हेक्टर क्षेत्र असताना गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रात वाढ होत गेल्याने सध्या ७९, ६८७ हेक्टर खरीप क्षेत्र झाले आहे. तर कृषी विभागाने खरीप क्षेत्राचा लक्षांक ८८ हजार ५६३ हेक्टर ठेवला आहे. यंदा तालुक्यात खरिपातील पीक पॅटर्नमध्ये बदल होत असून कापूस, मका क्षेत्रात घट होऊन सोयाबीन, बाजरी क्षेत्रात वाढ होणार असल्याचे चित्र आहे.
गेल्या हंगामात सेंद्रिय व गुलाबी अळीच्या आक्र मणामुळे कापूस पिकाचे उत्पादन घटले तर कापसाला अपेक्षित दरही मिळाला नाही. परिणामी सद्यस्थितीत गेल्यावर्षीचा कापूस अजूनही शेतकरीवर्गाकडे पडून आहे. मका पिकाला लष्करी अळीचा फटका बसल्यामुळे अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे तालुक्यात यंदा कापूस, मका पिकांचे क्षेत्र घटले आहे. १ येवला तालुक्यात कृषी विभागाची येवला, पाटोदा, अंदरसूल अशी तीन मंडळे आहेत. तालुक्यातील खरिपाच्या ७९ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रापैकी २६ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावर १५ जून अखेर पेरण्या झालेल्या असून, पेरणीची टक्केवारी ३३ टक्के आहे. तालुक्यात १५ जून अखेर क्षेत्रनिहाय झालेल्या पेरण्या अशा, तृणधान्य १९ हजार १५ हेक्टर, कडधान्य २,७६० हेक्टर, अन्नधान्य २१ हजार ७७५ हेक्टर, कापूस २ हजार ८३४ हेक्टर. २ शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील ममदापूर, साताळी, वाईबोथी, देवळाणे, सत्यगाव, सायगाव, खिर्डीसाठे, अनकाई या आठ गावांत फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. येवला तालुक्यात कृषी विभागातर्फे शेतीशाळा उपक्र म सुरू करण्यात आला आहे. या उपक्र मा- अंतर्गत तालुक्यात ४१ ठिकाणी शेती शाळा घेतल्या जाणार आहे.
३ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कृषी विभागाने बांधावर खत-बियाणे पोहोच करण्याची योजना राबविली आहे. या योजनेअंर्तगत येवला तालुक्यातील १२४ गावांमध्ये ४०३ शेतकरी गटांमार्फत २ हजार ६६५ टन खत व ६२९ क्विंटल बियाणे ५ हजार २६ शेतकऱ्यांना बांधावर पोहोचविण्यात आले आहे.
--------------------
यंदा येवला तालुक्याचा पीक पॅटर्न बदलला आहे. तालुक्यात सोयाबीन, बाजरीचे क्षेत्र यंदा वाढणार असून, कापूस व मका क्षेत्रात घट होणार आहे. यंदा कोरोनामुळे बाजारात सोयाबीन बियाणांचा तुटवडा निर्माण झालेला असल्याने घरची बियाणे वापरण्याचा सल्ला शेतकरीवर्गाला कृषी विभागाने दिलेला आहे.
- कारभारी नवले, तालुका कृषी अधिकारी, येवला

Web Title: Decline in cotton and maize area in Yeola taluka; Soybeans, market growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक