महागाई व बैलाची संख्या कमी झाल्याने मागणीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 10:34 PM2019-08-27T22:34:22+5:302019-08-27T22:34:36+5:30

खामखेडा : बैलाणसाठी पोळ्याच्या सणासाठी लागणारे साहित्य महागाई व बैलाची संख्या घटल्याने साहित्य खरेदीवर परिणाम दिसून येत आहे. आवघ्या दोन दिवसावर आलेल्या पोळा सण शेतकऱ्याचा दृष्टीने फार महत्वाचा अ्रसून वर्षभर शेतात राबणाºया सर्जा-राजा म्हणजे बैलपोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो.

Decline in demand due to inflation and reduced number of bulls | महागाई व बैलाची संख्या कमी झाल्याने मागणीत घट

महागाई व बैलाची संख्या कमी झाल्याने मागणीत घट

Next
ठळक मुद्देवस्तुंच्या मागणी मघ्ये घट झाल्याचे व्यापारी वर्गाकडून व्यक्त होतांना दिसून येत आहे.

खामखेडा : बैलाणसाठी पोळ्याच्या सणासाठी लागणारे साहित्य महागाई व बैलाची संख्या घटल्याने साहित्य खरेदीवर परिणाम दिसून येत आहे.
आवघ्या दोन दिवसावर आलेल्या पोळा सण शेतकऱ्याचा दृष्टीने फार महत्वाचा अ्रसून वर्षभर शेतात राबणाºया सर्जा-राजा म्हणजे बैलपोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो. यासाठी बैलांना सजविले जाते. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैलजोडी हमखास असायची, गावातील मोठ्या शेतकºयाच्या घरासमोर निदान तीन-चार बैल असल्याचे. ज्या शेतकºयांकडे दोन-तीन बैलजोडी असली म्हणजे तो गावात श्रीमंत असायचा. आता ट्रॅक्टरच्या सह्याने शेती केली जात आहे. शेतीसाठी लहानट्रॅक्टरही वापरली जात आहेत. शेतीच्या कामासाठी अत्याधुनिक साधने कारखान्यात तयार होऊ लागल्याने बैलांच्या संख्येत घट झाली. काही शेतकºयांकडे तर बैलजोडीच नाहीत, ते भाड्याने ट्रॅक्टर घेऊन शेतीची कामे करतात. त्यामुळे बैलाच्या संख्येत घट झाल्याची दिसून येत आहे. आणि प्रत्येक शेतकºयाला अता बैल घेणे परवडत नाही. या वर्षी बैलाच्या साजसाठी लागण्यारे सूत दोरखंड, झुल, रंग, चामडे आदींचे भाव वाढले आहेत. तसेच बैलांच्या सख्येत घट झाल्याने पोळ्याच्या सणासाठी लागणारे गोंडे, गौघर, पैंजण, बेगड, शिंगासाठी कलर, झुला, कासरा आदी वस्तुंच्या मागणी मघ्ये घट झाल्याचे व्यापारी वर्गाकडून व्यक्त होतांना दिसून येत आहे.

Web Title: Decline in demand due to inflation and reduced number of bulls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी