मूर्ती संकलनात घट हे पर्यावरण जागृतीचे द्योतक; अंनिसचे महेंद्र दातरंगे यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 11:45 PM2020-09-04T23:45:24+5:302020-09-04T23:48:20+5:30
नाशिक- पर्यावरण स्नेही गणेश विसर्जनासाठी महापालिका आणि सेवाभावी संस्थांनी यंदाही मूर्ती संकलन केले असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत १३ हजाराने मूर्ती संकलन घटले आहे. अर्थात, मूर्ती न देणाऱ्यामध्ये वाढ झाली नसून नागरीकांत जागृकता झाल्याने आता नागरीक घरीच विसर्जन करीत आहेत, त्यामुळे मूर्ती संकलनात घट हे सुचिन्हच असल्याचे मत महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्यवाह महेंद्र दातरंगे यांनी व्यक्त केले.

सव्वा दोन दशकांपूर्वी नाशिकमध्ये विसर्जित मूर्ती दानाची चळवळ रूजविणाºया अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये दातरंगे देखील सहभागी होते. त्यांच्याशी साधलेला संवाद..
प्रश्न: नाशिकमध्ये विसर्जित मूर्ती दानाच्या चळवळीला यंदा अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही असे वाटते का?
दातरंगे: मला वाटते पर्यावरण स्नेही विसर्जनास दिवसेदिवस प्रतिसाद वाढत आहे. यंदा १ लाख १६ नागरीकांनी विसर्जित मूर्तींचे दान केले. गेल्यावर्षी पेक्षा ते कमी असले तरी यावेळी मुळात कोरोनाचा प्रभाव होता. त्यामुळे सार्वजनिक मंडळांची संख्या घटली आणि नागरीकांनी नेहेमीप्रमाणेच घरोेघर गणपती बसविल्यानंतर त्याचे विसर्जन घरीच केले. अलिकडे घरीच मूर्ती तयार करून विर्सजन घरीच बागेत करण्याची पध्दत रूढ झाली आहे. त्यामुळे किमान एक लाख मूर्तींचे तरी विर्सजन घरीच झाल्याचे दिसत आहे.
प्रश्न: दाभोलकर यांच्या या योजनेला प्रतिसाद वाढतोय का?
दातरंगे: सव्वा दोन दशकांपूर्वी ही चळवण अंनिसने सुरू केली. गणपती ही बुध्दीची देवता मानली जाते मग बुध्दी वापरून हा उत्सव का केला जात नाही असे सांगून श्रध्दास्थानाला ठेच न पोहोचवता मोहिम सुरू झाली आणि आज ती संपुर्ण राज्यात वाढली आहेत. जेव्हा लोकचळवळ होते, तेव्हा त्यात राहायचे नाही ही दाभोलकर यांची भूमिका असल्याने नाशिकमध्ये महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कोणीही कार्यकर्ते मूर्ती संकलनासाठी उपस्थित राहत नाहीत.
प्रश्न: लोकांमध्ये पुरेसे प्रबोधन झाले आहे काय?
दातरंगे: गेल्या पाच ते सात वर्षात नागरीकांमध्ये प्रबोधन झाले आहे. नागरीक स्वत: घरीच मुलांच्या माध्यमातून मूर्ती तयार करतात आणि त्याचे बागेत विसर्जन करतात. शाडु मूर्तीच्या घरगुती उत्सवात वापर केला जातोे. त्याच बरोबर प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तींची अमोनियम बायोकार्बोनेटच्या माध्यमातून घरीच निर्गत केली जाते.
मुलाखत- संजय पाठक