मागणी घटली : विक्री कमी झाल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर येवल्याची टिमकी झाली फायबर डिजिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:05 AM2018-03-02T00:05:10+5:302018-03-02T00:05:10+5:30
येवला : कातडीपासून तयार होणाºया टिमकी उद्योगावर यंदा डिजिटलच्या जमान्यात कातडी टिमकीची जागा फायबरने घेतल्याने पारंपरिक पद्धतीने कातडीपासून तयार होणाºया टिमकीचा आवाज बसला आहे.
येवला : कातडीपासून तयार होणाºया टिमकी उद्योगावर यंदा डिजिटलच्या जमान्यात कातडी टिमकीची जागा फायबरने घेतल्याने पारंपरिक पद्धतीने कातडीपासून तयार होणाºया टिमकीचा आवाज बसला आहे. पुढील वर्षी तर ही टिमकी हद्दपार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येवल्यात होळी आणि धूलिवंदनानिमित्त टिमक्या वाजविल्या जातात. लहान मुलांना टिमकी या देशीवाद्याचे मोठे आकर्षण असते. जनावरांच्या कातड्यापासून शहरातील चर्मकार समाज टिमक्या बनविण्याचे काम करतो. टिमक्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. दरवर्षी येवल्यात सात ते आठ हजारांच्या आसपास टिमक्या बनविल्या जातात. परंतु यंदा डिजिटल जमान्यात चामड्याची जागा फायबरने घेतल्याने केवळ तीन हजार टिमक्या येथील चर्मकारांनी बनविल्या आहेत. पुढील वर्षी ही कातडीची टिमकी हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. आज होलसेलच्या भावात टिमकी ४० ते ८० रुपयापर्यंत मिळते. याबाबत टिमकी कारागीर दगू पुरे सांगतात, वर्षभर कातडी कमविण्यासह विकण्याचा व्यवसाय करतो. पिढीजात टिमक्या बनविण्याचा व्यवसाय चालत आहे. आज डिजिटल जमान्यात रेडीमेड फायबर व अन्य साहित्य मिळू लागल्याने कातडी टिमकीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काळ बदलला तरीही टिमक्या चर्मकार टिमकी बनवून विकतो आहे. दरवर्षीपेक्षा यंदा मागणी अगदी कमीच असल्याचे दिसून येत आहे. यंदा बाजारात फायबरची टिमकी आली आहे. गोल रिंग, फायबर डफच्या साहाय्याने लावला की दोन मिनिटात ताशा व छोटी टिमकी तयार होते. कंपनीतून थेट माल बाजारात येऊ लागला आहे.