पालेभाज्यांचे घसरल्या : मेथी, शेपू, कोथिंबीर रुपया जुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:27 PM2020-11-22T21:27:58+5:302020-11-23T01:59:25+5:30
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत गत आठवड्या पासून विक्रीसाठी येणाऱ्या शेपू कोथिंबीर तसेच मेथी भाजीची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा मोठा परिणाम बाजारभावावर जाणवला आहे. कृषी बाजारसमितीत विक्रीला आलेल्या शेतमालाला मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील सुटत नाही त्यामुळे अनेक उत्पादक शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी कृषी उत्पन्न बाजारसमितीत सायंकाळी झालेल्या लिलावात मेथी शेपू तसेच कोथिंबीरच्या काही मालाला चक्क एक रुपया प्रति जुडी असा बाजारभाव मिळाला.

नोव्हेंबर महिन्यात शेतमालाला पोषक वातावरण असते त्यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम काही प्रमाणात शेतमालावर जाणवला होता तर सध्या पोषक असे वातावरण निर्माण झाल्याने पालेभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे रविवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथी शेपू कोथंबीर मालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली बाजार समितीतून पर राज्य तसेच परजिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात मला पाठवला जातो मात्र परराज्य व पण जिल्ह्यात स्थानिक शेतमाल सुरू झाल्याने बाजारभाव घसरले आहे. पालेभाज्यांत केवळ कांदापात मालाची आवक अत्यंत कमी असल्याने त्यातच ग्राहकांकडून मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने कांदापात दर 15 ते 25 रुपये प्रति जुडीपर्यंत टिकून आहेत असे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना लागवड सह दळणवळणाचा देखील खर्च सुटत नसल्याने बळीराजाने नाराजी व्यक्त केली आहे पालेभाज्या आवक वाढल्याने बाजार भावात मोठी घसरण झाली असली तरी हातगाडीवर भाजीपाला विक्री करणाऱ्या सर्वच भाजी विक्रेत्यांकडून मात्र मेथी शेपू कोथिंबीर 10 ते 15 रुपये प्रति जुडी विक्री करून सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक लुटमार केली जात आहे.